ग्लोबल

Israel-Hamas War: इस्राइलने गाझा पट्टीला भाजून काढले ; पॅलेस्टिनी नागरिकांची झाली ससेहोरपळ

सकाळ डिजिटल टीम

Israel-Hamas War: हमासने इस्राईलमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर गाझा पट्टीत उसळलेल्या युद्धाच्या ज्वाळांनी आणखी अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. हमासचे मुख्य केंद्र असलेल्या गाझा शहरालाच नव्हे, तर गाझा पट्टीतील सर्वच शहरांना, गावांना इस्राईलने आपल्या लढाऊ विमानांच्या माऱ्याच्या टप्प्यात आणले असल्याने सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांची जीव वाचविण्यास सुरक्षित ठिकाण शोधण्यासाठी ससेहोलपट होत आहे. याशिवाय, इस्त्राईलने गाझा सीमेजवळ त्यांच्या राखीव सैनिकांची जुळवाजुळव सुरु केल्याने युद्धाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

हमासने मागील आठवड्यात इस्त्राईलमध्ये रकिट हल्ला करण्याबरोबरच अनेक गावांमध्ये घुसखोरी करत किमान १५० इस्रायलींना ओलिस ठेवले आहे. यामुळे इस्राईल सरकार एक पाऊल मागे जाईल, ही हमासची अपेक्षा धुळीला मिळाली आहे. उलट, या घटनेमुळे आणखी संतप्त झालेल्या इस्राईलने आज सलग तिसऱ्या दिवशी बाँबफेक करत गाझा पट्टीला भाजून काढले.

हमासचे मुख्य केंद्र असलेल्या गाझा शहराला आणि परिसराला लक्ष्य करतानाच त्यांनी येथील अनेक इमारती आधीच जमीनदोस्त केल्या आहेत. आता त्यांनी गाझा पट्टीतील इतर शहरांनाही माऱ्याच्या टप्प्यात आणले असल्याने एकीकडे इस्राईल आणि दुसरीकडे समुद्र अशा कोंडीत सामान्य पॅलेस्टिनी नागरिक अडकला आहे.

हमासच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी करताना तोडलेले कुंपण इस्राईलच्या संरक्षण दलाने पुन्हा बांधून काढले आहे. हमासला संपूर्ण नेस्तनाबूत करण्याचा निर्धार केलेल्या इस्राईलने आपले पायदळ आणि रणगाडे यांच्याबरोबरच राखीव सैनिकांची सीमेजवळ जुळवाजुळव सुरु केली आहे.

सरकारच्या आदेश आल्यास आम्ही पुढील कारवाई सुरु करू, असे लष्कराने सांगितले. हवाई हल्ल्यांची तीव्रता कायम असून आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ४५० ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते.

सुरक्षित कॉरिडॉरची मागणी

इस्त्राईलच्या हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी शेकडो पॅलेस्टिनी नागरिकांनी संयुक्त राष्ट्रांच्या शाळांमध्ये आश्रय घेतला आहे. या नागरिकांपर्यंत बचावसाहित्य पोहचविण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर निर्माण करून द्यावा, अशी मागणी मानवतावादी संघटनांनी केली आहे. इस्राईलने गाझा पट्टीची संपूर्ण रसद बंद केली असल्याने सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.

सामूहिक हत्याकांड

"लहान बालके आणि त्यांच्या आई-वडिलांचे मृतदेह अनेक घरांमध्ये दिसत आहेत. हमासने केलेले हे सामूहिक हत्याकांडच आहे," असे मेजर जनरल इटाय सीमारेषेपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. गावाकडे येत असतानाच रस्त्यांवर मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत पडलेले आढळले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon Shirur Assembly election : दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपले

IND vs NZ 1st Test : नशीबानं थट्टा अशी मांडली...! Rohit Sharma ची विचित्र विकेट पडली, कॅप्टनलाही विश्वास बसेना

Diwali Dos and Don'ts: दिवाळीला कोणत्या गोष्टी कराव्या अन् कोणत्या नाही, वाचा एका क्लिकवर

Manini De : छोट्या पडद्यावर परतणार मानिनी डे; झी टीव्हीवरील मालिकेत साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT