Israel-Hamas War  Esakal
ग्लोबल

Israel-Hamas War : नेतन्याहू विरोधात इस्रायलींचे आंदोलन; 'मी तुझ्या आईवर...', पोलीस कर्मचारी आंदोलकाला शिवीगाळ करताना व्हिडिओ व्हायरल

Israel-Hamas war : नेतान्याहूंविरोधात पुन्हा एकदा लोकांचा रोष रस्त्यावर दिसून येत आहे. नेतान्याहू यांच्या निवासस्थानाजवळ जोरदार निदर्शने होत आहेत. आंदोलकाला ताब्यात घेत असताना इस्रायली पोलीस कर्मचारी शिवीगाळ करताना दिसत आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

गाझा आणि रफाहमध्ये भीषण हत्याकांड होऊनही बेंजामिन नेतन्याहू यांचे सैन्य हमासच्या ताब्यातून इस्रायलींना परत आणण्यात अयशस्वी ठरत आहे. यामुळे त्याच्या प्रियजनांमध्ये आणि इस्रायलींमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. गुरुवारपासून नेतान्याहूंविरोधातील जनतेचा रोष पुन्हा एकदा देशभरात रस्त्यावर दिसून आला. वृत्तानुसार, जेरुसलेममधील पंतप्रधान नेतन्याहू यांच्या निवासस्थानाजवळ मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत.

सुमारे 5000 लोकांच्या जमावाने मोर्चा काढला. यादरम्यान एका इस्रायली पोलिसाचे निर्लज्ज कृत्य समोर आले आहे. एका आंदोलकाला ताब्यात घेत असताना तो शिवीगाळ करताना दिसला. व्हिडिओमध्ये तो आंदोलकाला शिवीगाळ करताना दिसत आहे.

टाईम्स ऑफ इस्राइलच्या रिपोर्टनुसार, नेतन्याहू यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करणाऱ्यांची संख्या 3,000 होती. जेरुसलेममध्ये, सुमारे 5,000 लोकांच्या जमावाने पंतप्रधान नेतन्याहू यांचे निवासस्थान असलेल्या शहराच्या पश्चिमेकडील कोर्डेस ब्रिजपासून अझ्झा स्ट्रीटवर मोर्चा काढला. जेरुसलेममधील पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ झालेल्या आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर निदर्शकांना शिवीगाळ केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप आहे.

पोलीस कर्मचारी आंदोलकाला शिवीगाळ करताना व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. आरोपी पोलिस कर्मचारी आंदोलकाला "मी तुझ्या आईवर बलात्कार करीन" असे म्हणताना ऐकू येते. छोट्या क्लिपमध्ये, एक पोलीस अधिकारी स्थानिक आंदोलकाकडे जाताना आणि त्याच्याशी गैरवर्तन करताना दिसतो, असे द टाईम्स ऑफ इस्राइलच्या वृत्तात म्हटले आहे. त्याच्यासोबत इतर पोलीस अधिकारी असतात आणि ते त्याला त्या पोलीस अधिकाऱ्यापासून दूर घेऊन जातात.

इस्रायल पोलिसांनी सुरू केला तपास

इस्राइल पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले की, त्या पोलिस अधिकाऱ्याचे वर्तन अपेक्षित वर्तनाशी सुसंगत नाही. कठीण परिस्थितीतही आपल्या सैनिकांनी संयम गमावू नये, अशी आमची अपेक्षा आहे. या घटनेची चौकशी केली जाईल आणि तपासानंतर समोर येणाऱ्या निकालानुसार कारवाई केली जाईल.

ओलिसांच्या सुटकेसाठी नेतान्याहूंविरुद्ध आक्रोश

देशभरातील इतर शहरांमध्येही छोटी निदर्शने होत आहेत, असे अहवालात म्हटले आहे. आंदोलक नेतान्याहू सरकार हटवण्याची मागणी करत आहेत. लोकांचा आरोप आहे की, इस्राइल सरकारला 7 ऑक्टोबर रोजी हमासने ओलिस घेतलेल्या लोकांना परत आणता आलेले नाही. इस्त्रायली सरकार हमासविरुद्धच्या युद्धात अपयशी ठरल्याचा आणि अपहरण केलेल्या लोकांसाठी वाटाघाटी अयशस्वी झाल्याचा आरोप लोकांनी केला आहे. गर्दीत उपस्थित लोक 'आता निवडणुका घ्या' असे फलक घेऊन निषेध करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT