Israel Hamas War sakal
ग्लोबल

Israel Hamas War : हनियासाठी खोमेनींकडून प्रार्थना ; प्रार्थनेवेळी इराणमध्ये अमेरिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

इस्राईलच्या हल्ल्यात मारला गेलेला हमासचा म्होरक्या इस्माईल हनिया याच्या शवपेटीजवळ उभा राहून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी आज प्रार्थना केली. थेट तेहरानमध्येच हल्ला करत हनियाला मारल्याने खामेनी यांनी या हत्येचा सूड घेण्याचा निर्धार जाहीर केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

तेहरान : इस्राईलच्या हल्ल्यात मारला गेलेला हमासचा म्होरक्या इस्माईल हनिया याच्या शवपेटीजवळ उभा राहून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी आज प्रार्थना केली. थेट तेहरानमध्येच हल्ला करत हनियाला मारल्याने खामेनी यांनी या हत्येचा सूड घेण्याचा निर्धार जाहीर केला आहे. आजच्या प्रार्थनेवेळी हमासचे काही म्होरकेही उपस्थित होते.

हमासला इराणचा जाहीर पाठिंबा आहे. इस्राईलने बुधवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात हनिया आणि त्याचा शरीररक्षक मारले गेले. आज त्या दोघांसाठी तेहरान विद्यापीठात प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रचंड गर्दी जमली होती. खामेनी यांच्यासह इराणचे नवे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्‍कियान यांनी हनियाच्या शवपेटीजवळ उभा राहून प्रार्थना केली. यानंतर दोघांच्या शवपेट्या एका ट्रकमध्ये ठेवण्यात आल्या आणि रस्त्यांवरून अंत्ययात्रा काढण्यात आली. जमलेल्या हजारो लोकांनी यावेळी अमेरिका आणि इस्राईलच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हिज्बुल्लाचा म्होरक्या ठार

बैरुत : इराणच्या राजधानीत हल्ला करत हमासच्या राजकीय प्रमुखाला ठार मारल्यापूर्वी काही तास इस्राईलने लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये हल्ला केला होता. या हल्ल्यात हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेचा एक म्होरक्या फवाद शुकूर मारला गेल्याचे या संघटनेने आज जाहीर केले. इस्राईलच्या हल्ल्यात जी इमारत उद्ध्वस्त झाली, त्यात शुकूर राहत होता. इस्राईलमध्ये मागील आठवड्यात झालेल्या रॉकेट हल्ल्यात बारा मुलांचा मृत्यू झाला होता, या हल्ल्यामागे शुकूरचा हात होता असा इस्राईलचा दावा होता.

‘महंमद देफ हल्ल्यात ठार’

जेरुसलेम : इस्राईलने जुलैमध्ये गाझा पट्टीतील खान युनिस शहरावर केलेल्या एका हल्ल्यात हमासचा लष्करी विभागाचा प्रमुख महंमद देफ याला लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, या हल्ल्यात तो मेल्याचे जाहीर करण्यात आले नव्हते. हमासनेही देफ जिवंतच असल्याचे म्हटले होते. आज मात्र इस्राईलने १३ जुलैला झालेल्या त्या हल्ल्यात महंमद देफ मारला गेल्याचे स्पष्ट केले. त्या हल्ल्यात ९० जणांचा मृत्यू झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT