हमास दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे इस्त्राइलमध्ये घुसून हल्ला केला. यामध्ये 1000 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. इस्त्राइलने देखील त्यांना जोरदार उत्तर दिले. आतापर्यंत दोन्ही बाजूने 3000 जणांचा मृत्यू झाला आहे. हमास दहशतवाद्यांनी 20 मिनिटात 5 हजार मिसाईल इस्त्राइलवर डागले होते. यावेळी एका महिला सैनिकाने हमास दहशतवाद्यांचा जोरदार सामना केला.
25 वर्षीय इनबार लिबरमन यांनी हमासच्या हल्यापासून आपल्या समुदायातील लोकांना वाचवले. यावेळी तिच्या टिमने हमासच्या 24 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार केले. तर लीबरमनने 5 दहशतवाद्यांना एकटीने ठार केले. लिबरमनची तिच्या या शौर्यासाठी जगभरात चर्चा होत असून इस्त्राइली लोकांच्या नजरेत ती हिरो म्हणून उदयास आली आहे. (Latest Global News)
इनबार लिबरमन किबुट्झ कम्युनिटी Nir Am साठी सुरक्षा समन्वयक आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राइलवर हल्ला केल्यानंतर लिबरमन यांना स्फोटांचे आवाज ऐकू आले. स्फोटाचा आवाज ऐकताच लीबरमन सावध झाली. यावेशी तिने ताबडतोब 12 लोकांच्या सुरक्षा पथकासह कार्यभार स्वीकारला. लिबरमनने अप्रतिम शौर्य आणि शहाणपणा दाखवत आपल्या साथीदारांना महत्त्वाच्या जागांवर तैनात केले.
हमासच्या दहशतवाद्यांनी किबुत्झ नीर आमवर हल्ला करताच, लीबरमन आणि त्यांच्या टीमने चार तास दहशतवाद्यांशी धैर्याने मुकाबला केला आणि दोन डझनहून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. (Latest Marathi News)
दहशतवाद्यांनी निर आमच्या आजूबाजूच्या किबुत्झ किंवा समुदायाच्या गावांमध्ये नरसंहार केला आणि शेकडो लोकांना ठार केले. पण दहशतवाद्यांना निर आममध्ये कोणतेही नुकसान करता आले नाही. इनबार लिबरमनच्या शौर्याची इस्त्राइली सोशल मीडियावरही चर्चा होत असून इस्त्राइली सरकारने लिबरमनचा सन्मान करावा, अशी मागणी लोक करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.