ग्लोबल

Israel-Iran War: 'दोनशे क्षेपणास्त्र डागले पण हल्ला अपयशी', इस्राईलवरील हल्ल्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; बायडेन म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन: इराणकडून मंगळवारी रात्री इस्राईलवर सुमारे दोनशेहून अधिक क्षेपणास्त्र डागल्याने जगभरात खळबळ उडालेली असताना अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणचा हल्ला निष्प्रभ करत अपयशी केल्याची प्रतिक्रिया दिली. इराणच्या हल्ल्याच्या प्रभाव दिसून आला नाही, असे त्यांनी नमूद केले. अमेरिकेडून इस्राईलला पूर्णपणे पाठिंबा असून अमेरिकी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य असल्याचेही म्हटले आहे. दुसरीकडे इराणच्या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसल्याचे इस्राईलच्या सैनिकांनी सांगितले.

पश्‍चिम आशियात युद्धाचे ढग अधिक गडद होत असून मंगळवारी रात्री इराणने इस्राईलवर क्षेपणास्त्र हल्ले केले. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले, आमच्या निर्देशानुसार अमेरिकेच्या सैनिकांनी इस्राईलच्या संरक्षणासाठी खंबीर पाठिंबा दिला आणि आम्ही इराणच्या हल्ल्याच्या परिणामाचे आकलन करत आहोत. सध्याची स्थिती पाहिल्यास इराणचे हल्ले पूर्णपणे अपयशी आणि निष्प्रभ झाल्याचे दिसून येते. प्रतिकारक्षमता पाहता इस्राईलची सैन्य शक्ती आणि अमेरिकी सैनिकांची सिद्धता स्पष्ट होते.

व्हॉईट हाऊस येथे बेालताना बायडेन म्हणाले, इराणच्या हल्ल्याला केलेला प्रतिकार पाहिल्यास अमेरिका आणि इस्राईल यांची रणनीती आणि बचावात्मक धोरणांची प्रचिती येते. अमेरिकेचा इस्राईलला पाठिंबा असून यात कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही.

यादरम्यान, बुधवारी सकाळी आणि दुपारी बायडेन यांनी राष्ट्रीय सुरक्षा पथकासमवेत खलबतं केली. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा पथक हे इस्राईलचे अधिकारी आणि समकक्ष घटकांशी सातत्याने संपर्कात आहे, असे बायडेन म्हणाले. या भागात घडणाऱ्या घडामोडींवर बारकाईने नजर ठेवली जात असल्याचे ते म्हणाले. बायडेन यांनी अमेरिकी सैनिकांना इराणच्या हल्ल्याविरोधात इस्राईलला मदत करण्याचे आणि देशाला टार्गेट करणारी क्षेपणास्त्र पाडण्याचे निर्देश दिल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

''मी आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस आम्ही राष्ट्रीय सुरक्षा समितीसमवेत चर्चा केली आणि इस्राईलवरचे हल्ले हाणून पाडण्यासाठी आणि अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा करण्यासाठी सज्ज आहोत का? याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली'' असे ते म्हणाले. पेंटागॉनचे मेजर जनरल पॅट्रिक एस.रायडर यांनी सांगितले, की इराणचे बहुतांश क्षेपणास्त्र हे लक्ष्य गाठण्यापूर्वीच नष्ट झाले. मात्र काहींमुळे फटका बसला असला तरी नुकसान कमी झाले आहे. पूर्व भूमध्य सागरात तैनात असलेल्या बर्क श्रेणीतील युद्धनौका यूएस कोल आणि यूएस बुल्केली यांनी इस्राईलच्या संरक्षणार्थ इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांवर एक डझनभर क्षेपणास्त्र भेदी अस्त्र डागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: कोर्टामध्ये नराधम ढसाढसा रडला; वानवडी अत्याचार प्रकरणी आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

Video Viral : समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो अन् Rohit Sharma ची मनं जिंकणारी कृती

Pune: एक कॉल अन् विषय संपणार! बारामती हत्या प्रकरणानंतर अजितदादांचं मोठं पाऊल, नव्या उपक्रमाची घोषणा

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचे नऊ महिन्यांचे पैसे मिळणार; बारामतीमध्ये अजित पवारांची माहिती

Jawan Found After 56 Years: 56 वर्षांनंतर मिळाला जवानाचा मृतदेह! 1968 मध्ये कोसळलं होतं हवाई दलाचं विमान

SCROLL FOR NEXT