ग्लोबल

Israel-Lebanon War: इस्राईलच्या हल्ल्यात २७४ जण ठार, एक हजारहून अधिक जखमी; ८०० ठिकाणी हवाई हल्ले

Latest Videsh Batmya: इस्राईलच्या या माऱ्यात २७४ दहशतवादी व नागरिकांचा मृत्यू झाला असून एक हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Latest War News: लेबनॉनमध्ये क्षेपणास्त्र हल्ले करणाऱ्या इस्राईलने आज या हल्ल्यांची तीव्रता वाढवत अत्यंत घातक हवाई मारा केला. लेबनॉनमधील सुमारे तीनशे ठिकाणांवर इस्राईलने लढाऊ विमानांद्वारे बाँबफेक केली. इस्राईलच्या या माऱ्यात २७४ दहशतवादी व नागरिकांचा मृत्यू झाला असून एक हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत.

हल्ला तीव्र करणार असल्याने लेबनॉनमधील सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांनी घर सोडून निघून जावे, असे आवाहन आज सकाळी इस्राईलने केले होते. त्यानंतर दक्षिण लेबनॉनमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांनी मिळेल ते सामान घेत देशाच्या उत्तर दिशेने निघून जाण्यास सुरुवात केल्याने यामुळे महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

नागरिक निघून जात असतानाच इस्राईलने हिज्बुल्लाविरोधात प्रचंड मोठी लष्करी कारवाई करत दहशतवाद्यांनी आश्रय घेतलेल्या आणि त्यांचे शस्त्रसाठे असलेल्या परिसरावर क्षेपणास्त्र व बाँबवर्षाव केला.

हिज्बुल्लाची हल्ला करण्याची क्षमता नष्ट करण्याच्या उद्देशाने हे हल्ले करण्यात आले. सुमारे आठशे ठिकाणांना इस्राईलने लक्ष्य केले. दक्षिण लेबनॉनमधील बेका खोऱ्यात असलेल्या निवासी भागांवरही बाँबफेक झाल्याने २७४ जणांचा मृत्यू झाला. इस्राईलने लेबनॉनमध्ये सुमारे ८० मैल आतपर्यंत मारा केला.

हिज्बुल्ला आणि इस्राईल हे मागील आठवड्यापासून जवळपास रोजच एकमेकांवर तुफान हल्ले करत आहेत. दोन दिवसांपूर्वी इस्राईलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये ४७ जणांचा मृत्यू होता. इस्राईलने लेबनॉनच्या सीमेजवळ सैन्याचीही जुळवाजुळव केली आहे. त्यामुळे या सीमेवरही युद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इस्राईलने गाझा पट्टीतही नागरिकांना निघून जाण्याचा इशारा देत नंतर बाँबवर्षावात परिसर भाजून काढला होता. लेबनॉनमध्येही असाच हल्ला झाल्याने पश्‍चिम आशियात प्रादेशिक युद्धाचा भडका उसळण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, इस्राईलच्या या हल्ल्यानंतर हिज्बुल्लानेही इस्राईलच्या उत्तर सीमेवर रॉकेटचा मारा केला. मात्र, या हल्ल्यात इस्राईलचे फारसे नुकसान झाले नाही.

सध्या फक्त हवाई हल्ले

लेबनॉनमध्ये सध्या केवळ जोरदार हवाई हल्ले करण्याचेच नियोजन असल्याची माहिती इस्राईलच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. ‘आम्ही केवळ लढाऊ विमानांचा आणि क्षेपणास्त्रांचा वापर करणार असून जमिनीवरील मोहीम राबविणार नाही. हिज्बुल्लाकडून होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी कारवाई करणार आहोत,’ असे या अधिकाऱ्याने सांगितले.

नागरिकांच्या मोबाईलवर इशारा

लेबनॉनमधील सीमाभागात राहणाऱ्या अनेक नागरिकांना आज त्यांच्या मोबाईलवर संदेश आले. हिज्बुल्ला संघटनेच्या शस्त्रसाठ्यानजीक राहणाऱ्यांनी तातडीने निघून जावे, असे या संदेशात इस्राईलने म्हटले होते. नागरिकांना मानसिकदृष्ट्या घाबरवून टाकण्यासाठीच असे संदेश पाठविल्याचा दावा लेबनॉनच्या सरकारने केला होता. मात्र, त्यानंतर काही तासांतच या परिसरात जोरदार हवाई हल्ले झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

Latest Maharashtra News Updates : महायुतीचं निर्विवाद वर्चस्व! देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Maharashtra Assembly Election Result: पुण्यातील 'या' मतदारसंघात अनेक वर्षांची परंपरा कायम; जनतेचा कौल नव्या आमदाराकडेच

Hemant Soren : झारखंडचा गड सोरेन यांनी राखला...इंडिया आघाडीला दोन तृतीयांश बहुमत; भाजपचा रथ रोखला

SCROLL FOR NEXT