Israel on All eyes on Rafah  esakal
ग्लोबल

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे फुटलेले का? इस्रायलचे 'त्या' व्हायरल फोटोला प्रत्युत्तर

इस्त्रायलने राफावर एअर अटॅक केला असून जगभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे

सकाळ डिजिटल टीम

Israel on All eyes on Rafah :

सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या ‘All eyes on Rafah’ या फोटोला इस्त्रायलने प्रत्युत्तर दिले आहे. AI वर जनरेट केलेला एक फोटो पोस्ट करून 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे कुठे होते, असा सवाल इस्त्रायलने जगाला केला आहे.

इस्त्रायलने राफावर एअर अटॅक केला आहे. त्यात मोठा नरसंहार झाला असून जगभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. राफावर इस्रायली हवाई हल्ल्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जगभरातील सेलिब्रिटी, क्रीडापटू आणि इतर लाखो सोशल मीडिया वापरकर्त्यांनी 'ऑल आइज ऑन राफा' फोटो शेअर केला आहे.

त्यावर आता इस्त्राइलने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्याची पोस्ट का केली नाही, असा प्रश्न लोकांना विचारला आहे. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात इस्रायलमधील अंदाजे १,१६० लोक मारले गेले, ज्यात बहुसंख्य नागरिक होते.

काय झालं होतं ७ ऑक्टोबरदिवशी

७ ऑक्टोबर २०२३ मध्ये गाझामध्ये इस्रायली हल्ल्यात ३६,१७१ पॅलेस्टिनी ठार झाले होते. तर २९० इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला होता. याच दिवशी हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून नरसंहार केला होता. गर्भवती महिला, मुलं, वुद्ध यांची निदर्यतेने हत्या केली होती.

अतिरेक्यांनी सुमारे २५० लोकांना बंदीही बनवले होते. नोव्हेंबरमध्ये आठवडाभर चाललेल्या युद्धाच्या शेवटी काही लोकांना सोडण्यात आले. तर, ९९ लोक अजूनही जिवंत आहेत आणि ३१ मरण पावले आहेत.

आता राफामध्ये नक्की काय सुरू आहे

राफामध्ये सध्या इस्त्रायली रणगाडे मंगळवारी रफाह येथे आले आणि आता शहराच्या मध्यभागी गस्त घालत आहेत आणि गोळीबार करत आहेत. शहरातील तेल अल-सुलतान भागात ड्रोनने निर्वासितांच्या तंबूंना लक्ष्य केल्याचे वृत्त आहे. हमास आणि इस्लामिक जिहादचे दहशतवादी टँकविरोधी रॉकेट, मोटार वापरून आणि रस्त्यावर स्फोटक यंत्रे ठेवून इस्रायली सैन्याचा प्रतिकार करत आहेत.

हमासच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्त्रायलने रफाहवर हल्ला केला असल्याचे मान्यच केलेले नाही. ट्विटरवरील एका पोस्टमध्ये, "7 ऑक्टोबर रोजी तुमचे डोळे कुठे होते" या मथळ्यासह एक चित्र शेअर केले. एका मुलासमोर हमासचा दहशतवादी उभा असल्याचे चित्रात दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT