पॅलेस्टाईन-इस्राइल युद्धाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. गाझा सीमेवरील इस्राइलच्या ज्या भागावर हमासने ताबा मिळवला होता, तो भाग इस्राइलने पुन्हा मिळवला आहे. सोबतच ही बॉर्डर आता सील करण्यात आल्याची माहिती इस्रायली सैन्याने दिली आहे.
शनिवारी हमासने गाझा पट्ट्यातून इस्राइलवर तब्बल 5,000 क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. यासोबतच हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या सीमेमधून घुसखोरी करत शेकडो नागरिकांना ठार केलं, आणि तेवढ्याच नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. यानंतर इस्राइलने युद्धाची घोषणा करत हमासवर पलटवार केला होता.
या युद्धामध्ये आतापर्यंत तीन हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. इस्राइलच्या 1,000 नागरिकांचा मृत्यू झाला असून, सुमारे 2,700 नागरिक जखमी आहेत. गाझा पट्ट्यात सुमारे 900 जणांचा मृत्यू झाला असून, 4,250 जण जखमी आहेत. दोन्ही देशांच्या आरोग्य यंत्रणांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे. यासोबतच आपण हमासचे शेकडो दहशतवादी ठार केल्याचा दावा देखील इस्राइलने केला आहे.
आपले सुमारे 150 नागरिक अजूनही हमासने ओलीस ठेवल्याची माहिती इस्राइलने दिली आहे. यामध्ये बहुतांश लहान मुले आणि वयोवृद्ध असल्याचंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. हमास या लोकांचा वापर करुन, त्यांना सोडण्याच्या बदल्यात तुरुंगातील दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी करु शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.