Benjamin Netanyahu Hospitalized eSakal
ग्लोबल

Benjamin Netanyahu Hospitalized : इस्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू रुग्णालयात दाखल; पेसमेकर बसवण्यासाठी होणार शस्त्रक्रिया

Benjamin Netanyahu : अवघ्या काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

Sudesh

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर पेसमेकर बसवण्यासाठी शस्त्रक्रिया होणार आहे. आज पहाटे त्यांच्या कार्यालयाने याबाबत माहिती दिली.

अवघ्या काही दिवसांपूर्वीच ते रुग्णालयातून डिस्चार्ज झाले होते. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. "पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावर आज रात्री शेबा मेडिकल सेंटरमध्ये शस्त्रक्रिया पार पडेल. यात त्यांच्या शरीरात पेसमेकर बसवण्यात येईल." असं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे.

"पंतप्रधान हे औषधांच्या प्रभावाखाली असताना, न्याय मंत्री आणि उपपंतप्रधान यारीव लेनिन त्यांच्या जागी प्रभारी असतील", असंही पंतप्रधानांच्या कार्यालयाने स्पष्ट केलं आहे. (Israel PM Hospitalized)

आठवड्यापूर्वीच झाले डिस्चार्ज

एक आठवड्यापूर्वीच नेतान्याहू यांना याच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. वारंवार चक्कर येत असल्याच्या तक्रारीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

यावेळी कार्डिओलॉजिकल चाचण्यांचा भाग म्हणून, नेतान्याहू यांच्या हार्ट रेटची निगराणी करण्यासाठी हॉल्टर मॉनिटर वापरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी त्यांच्या शरीरात हे डिव्हाईस इम्प्लांट करण्यात आले होते. शनिवारी रात्री या डिव्हाईसने धोक्याचा इशारा दिला. यानंतर त्यांच्या शरीरात पेसमेकर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: ‘सकाळ’च्या डिजिटल पानाचा गैरवापर; एकावर गुन्हा दाखल, निवडणूक प्रचाराबाबतच्या खोडसाळपणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश! इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या १३४ कर्मचाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे; ‘या’ ८ मतदारसंघातील आहेत कर्मचारी

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

SCROLL FOR NEXT