Israel Attack 
ग्लोबल

Israel Attack : निर्वासितांच्या छावणीवर इस्राईलचा हल्ला;महिला व मुलांसह ३३ ठार,हमासच्या दहशतवाद्यांना ‘टार्गेट’ केल्याचा दावा

हमास व इस्राईल यांच्यात संघर्ष सुरूच असून, आज पहाटे इस्राईलने मध्य गाझातील नुसीरत परिसरात निर्वासितांच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात ३३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात महिला व लहान मुलांचा समावेश आहे. इस्राईलने जमिनीवरून आणि आकाशातून हल्ले केल्याचे सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

डेर अल बलह (गाझा पट्टी) : हमास व इस्राईल यांच्यात संघर्ष सुरूच असून, आज पहाटे इस्राईलने मध्य गाझातील नुसीरत परिसरात निर्वासितांच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात ३३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात महिला व लहान मुलांचा समावेश आहे. इस्राईलने जमिनीवरून आणि आकाशातून हल्ले केल्याचे सांगितले. दरम्यान, हमासच्या अल अक्सा माध्यमाने या हल्ल्यात ३९ जणांचा बळी गेल्याचे म्हटले आहे. या हल्ल्याला इस्राईलच्या संरक्षण दलाने दुजोरा दिला. ‘यूएनआरडब्लू’च्या या शाळेत हमासच्या नुखबा फोर्सच्या दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याने हल्ले करत त्यांना लक्ष्य केल्याचा दावा इस्राईलने केला.

ऑक्टोबर महिन्यांत इस्राईल-हमास यांच्यात संघर्ष सुरू झाल्यानंतर दहा लाखांहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत. त्यांनी गाझातील वेगवेगळ्या ठिकाणी, शाळा आणि रुग्णालयात आश्रय घेतला आहे. नुसीरत निर्वासितांची छावणी ही गाझा पट्टीच्या मधोमध आहे. १९४८ मध्ये इस्राईलची स्थापना झाल्यानंतर लाखो पॅलेस्टिनी बेघर झाले आणि त्यांना आश्रय देण्यासाठी गाझा भागातील नुसीरत छावणी उभारण्यात आली होती.

इस्राईलची संरक्षण आघाडी ‘आयडीएफ’च्या दाव्यानुसार या छावणीवर हल्ला करण्यापूर्वी नियोजन केले. सामान्य नागरिकांचे कमीत कमी नुकसान व्हावे, याकडे लक्ष देण्यात आले. यासाठी हवाई टेहेळणी करण्यात आली. तसेच इस्राईलच्या गुप्तचर यंत्रणांकडूनही माहिती गोळा करण्यात आली. या नुसार हल्ला केल्याचे इस्राईलने म्हटले आहे. इस्राईलच्या हल्ल्यानंतर गाझातील हमासच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या माध्यमाने देखील निवेदन जारी केले. त्यांनी शाळेवरच्या हल्ल्याला नरसंहार असे म्हटले आहे. या हल्ल्यातील जखमींना अल अक्सा मार्टियर रुग्णालयात दाखल केले आहे.

अल जझिराच्या एका अहवालानुसार, यूएन रिलीफ ॲड वर्क एजन्सी (यूएनआरडब्लूए) कडून गाझात १८३ शाळा चालविल्या जातात. मात्र संघर्ष सुरू झाल्यानंतर या शाळांच्या इमारतीची जागा निर्वासितांना राहण्यासाठी देण्यात आली. आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या हल्ल्यात या ठिकाणी राहणाऱ्या ४५५ जणांचा मृत्यू झाला आहे. इस्राईलने यापूर्वीही ११ आणि १३ एप्रिल रोजी नुसीरत रिफ्यूजी कॅम्पमध्ये असलेल्या शाळांवर हल्ले केले.

त्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. कालच्या हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शी आणि रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूएनने निर्वासितांसाठी नुसीरत परिसरातील सरर्दी शाळेत छावणी सुरू केली असून त्यात आज पहाटेच हल्ले झाले. या शाळेत पॅलिस्टिनी नागरिकांची संख्या लक्षणीय होती. ते उत्तर गाझातील इस्राईलच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी थांबले होते. शहरातील निर्वासित अयमान रशीद म्हणाले, क्षेपणास्त्रांनी शाळेच्या दुसरी आणि तिसऱ्या मजल्यावरील वर्गाला लक्ष्य केले. या ठिकाणावरून पाच जणांना बाहेर काढण्यात मदत केली आणि त्यात एक ज्येष्ठ नागरिक आणि दोन मुलांचा समावेश होता. पीडितांना सुरक्षित ठिकाणी नेताना बऱ्याच अडचणी आल्या. हल्ल्यात जखमी झालेल्यांना जवळच्या अल अक्सा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गाझातील रुग्णालये नागरिकांनी भरलेली

गाझा भागातील रुग्णालयांच्या परिसरात रुग्णवाहिकांची रांग लागलेली असते, असे रुग्णालयात काम करणारे फोटोग्राफर उमर अल डेरावी यांनी सांगितले. इस्राईलने गुरुवारी हल्ला केल्यानंतर रुग्णालयाच्या एका ऑनलाइन व्हिडिओमध्ये रुग्णालयाच्या फरशीवर उपचार घेणारे नागरिक दिसतात. गाझातील रुग्णांचे वॉर्ड गर्दीने खचाखच भरलेले दिसतात. रुग्णालयाच्या बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे रुग्णालयाचे कर्मचारी जनरेटरसाठी इंधन आणताना दिसतात. एका पत्रकाराने या हल्ल्यात किमान ३३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यात चौदा मुले आणि नऊ महिलांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. रात्री एका घरावर झालेल्या अन्य हल्ल्यांत सहा जणांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: कसली ही नामुष्की! मनसेचा मुंबईत सुपडा साफ पण या उमेदवारांना दिला दणका..वाचा कोणाला किती मतं मिळाली?

Mumbai Vidhansabha Result 2024: मुंबईत महिलांनी पुरुषांना टाकलं मागे; आकडेवारी वाचून व्हाल थक्क!

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत तासभर चर्चा

Hingna Assembly Election : हिंगण्यात ‘लाडक्या बहिणी’च ठरल्या ‘गेमचेंजर’...महायुतीच्या ‘लिड’मध्ये दुप्पटीने वाढ, महाविकास आघाडी हवेत

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT