नवी दिल्ली : इंडिगो एअरलाईन्सच्या गंभीर चुकीमुळं एका भारतीय जोडप्याला २४ तास इस्तंबूलच्या विमानतळावर केवळ खुर्च्यांवर बसून काढावे लागले आहेत. विशेष म्हणजे यातील पुरुष वृद्ध व्यक्ती ही व्हिलचेअरवर बसून होती. या प्रकारामुळं सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या जोडप्याची कनेक्टिंग फ्लाईट मिस झाल्यानं हा प्रकार घडला आहे. (Istambul News Spent 24 hours on chairs due to Indigo Airlines mistake an elderly couple experienced dire situation)
राजेश शहा (वय ६४) आणि रश्मी शहा (वय ५९) यांच्याकडं १७ ऑगस्ट २०२३ रोजी लंडन ते मुंबई प्रवाशासाठी एकच पीएनआर तिकीट होतं. त्यांनी तुर्की एअरलाइन्सद्वारे चालवल्या जाणार्या लंडन-इस्तंबूल सेक्टरच्या एअरलाइनकडून तिकीट बुक केलं होतं आणि पुढे इंडिगोनं इस्तंबूलहून मुंबईला जाण्यासाठी तिकीट बुक केलं होतं. (Latest Marathi News)
पण इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचारी या जोडप्याला या कनेक्टिंग फ्लाईटमध्ये त्यांना बसवायचं विसरुन गेले. त्यामुळं या जोडप्याला तब्बल २४ तास भयानक परिस्थितीत इस्तंबूलच्या विमानतळावर केवळ खुर्च्यांवर बसून रहावं लागलं.
या प्रकरणाची माहिती देताना या जोडप्याची मुलगी रिचा शहा यांनी सांगितलं की, माझे वडील व्हीलचेअरवर असतात कारण ते आजारी आहेत. माझ्या आईवरही शस्त्रक्रिया तिल्या खूप वेळ चालता येत नाही. यासाठी आम्ही त्यांना विमानतळावर वापरण्यासाठी व्हीलचेअर बुक केल्या होत्या.
वेळापत्रकानुसार ते इस्तंबूलला पोहोचले. पण इथं लँडिंग केल्यानंतर, ग्राउंड स्टाफनं त्यांना मुंबईकडं जाणाऱ्या कनेक्टिंग फ्लाइटच्या एरियापर्यंत पोहोचवलं. त्यांना तिथं बोर्डिंग पाससह बोर्डिंग गेटवर बसायला लावलं. काही तास उलटून गेल्यावर माझी आई फ्लाइट नेमकी कधी आहे हे तपासण्यासाठी काउंटरवर गेली. (Marathi Tajya Batmya)
तर तिथल्या कर्मचाऱ्यांनी तिच्याकडून बोर्डिंग पास घेतले आणि पुढील सूचना मिळेपर्यंत बसण्यास सांगितलं. हे वारंवार घडलं, त्यांना फक्त आमचे सुपरव्हायझर येत आहेत त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे असं सांगण्यात आलं.
पण शेवटी मुंबईला जाणारं विमान निघून गेल्याचं त्यांना सांगण्यात आलं. या प्रकारानंतर ते घाबरले त्यांना मदत करण्यासाठी इंडिगोशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तर विमानतळावरील स्थानिक कर्मचारी फक्त तुर्की बोलतात आणि माझ्या आई-वडिलांना त्यांच्याशी संवाद साधता आला नाही.
शेवटी जेव्हा रिचा यांनी भारतातून इंडिगोच्या हेल्पलाइनवर फोन केला तेव्हा त्यांना दुसऱ्या दिवशी मुंबईच्या फ्लाइटसाठी बोर्डिंग पास दिला. माझे आई-वडील हे शाकाहारी आहेत आणि त्यांना सतत औषधोपचार आणि वैद्यकीय मदतीची गरज असते.
पण इस्तंबूलच्या विमानतळावर ते २४ तास अशा बिकट अवस्थेत अडकून पडले होते. त्यांनी विमानतळावरील निर्जन ठिकाणी 24 तास खुर्च्यांवर केवळ ब्रेड आणि कोक पिऊन घालवले. त्यांना सांगण्यात आलं की, दुसऱ्या दिवशीच्या फ्लाइटसाठी त्यांना इथूनच विमानापर्यंत नेलं जाईल.
या प्रकारावर प्रतिक्रिया देताना इंडिगोनं आपल्या निवदेनात म्हटलं की, “17 ऑगस्ट 2023 रोजी लंडनहून मुंबईला इस्तंबूलमार्गे प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ जोडप्यासोबत इस्तंबूल विमानतळावर अडकून पडल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. मानवी चुकीमुळं घडलेली ही खेदजनक घटना होती.
आमच्या तुर्कीच्या ग्राउंड हँडलिंग सर्व्हिसेसमुळं या जोडप्याचं मुंबईला जाणारं कनेक्टिंग फ्लाइट चुकलं. इस्तंबूल इथल्या इंडिगोच्या टीमनं मदत पुरवली आणि त्यांना पुढील विमानापर्यंत पोहोचवलं. आमच्या भागीदार एअरलाइनशी आम्ही या चुकीवर बातचित केली आहे. तसेच पीडित प्रवाशांची आम्ही मनापासून माफी मागतो”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.