नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यानं भारतातून फरार असलेला आणि पाकिस्तान स्थायिक झालेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं खुलेआम कौतुक केलं आहे. दाऊदचा व्याही होणं हे आपल्यासाठी सन्मानजनक आहे. लोकांना दाऊदच्या कुटुंबियांबाबत अनेक गैरसमज आहेत. खऱ्या दाऊदला समजून घेणं सोपं नाही, असंही त्यानं म्हटलं आहे. (It is a matter of pride for Dawood Ibrahim says Javed Miadad)
काय म्हणाला जावेद मियाँदाद
एका युट्यूब चॅनेलवर मुलाखतीत बोलताना जावेद मियाँदाद म्हणाला, मी दुबईपासून बऱ्याच काळापासून दाऊद इब्राहिमला ओळखतो. माझ्यासाठी ही गौरवाची बाब आहे की, त्यांच्या मुलीनं माझ्या मुलाशी लग्न केलं आहे. माझी मुलगी बरीच शिकलेली आहे. तिनं कॉन्व्हेन्ट शाळेतून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी एका प्रसिद्ध विद्यापीठात गेली. मियाँदादचा मुलगा जुनैद याचं लग्न दाऊदची मुलगी महरुख हिच्याशी झालं आहे. दोघांनी दुबईत २००५ मध्ये लग्न केलं होतं. (Marathi Tajya Batmya)
खऱ्या दाऊदला समजणं सोप नाही - मियाँदाद
मियाँदाद म्हणाले, लोकांनी दाऊद इब्राहिमच्या कुटुंबियांबाबत चुकीचा समज बनवून घेतला आहे. खऱ्या दाऊदला समजून घेणं सोप नाही. लोक त्यांच्या कुटुंबियांबाबत जसा विचार करतात तसे ते बिल्कुल नाहीत. (Latest Marathi News)
दाऊद आणि मियाँदाद कोण आहेत?
दाऊद इब्राहिम हा भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन आहे. त्यानं १९९३ मधील बॉम्ब स्फोटाचा कट रचला होता. यामध्ये २५० लोकांचा मृत्यू झाला होता. दाऊद सध्या पाकिस्तानातील कराची शहरातील पॉश क्लिफ्टन भागात राहतो आहे. पण पाकिस्ताननं कायमच याचा इन्कार केला आहे.
दर दुसरीकडं जावेद मियाँदाद हा पाकिस्तानचा माजी क्रेकिटर असून त्यानं आपल्या २० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या करियरमध्ये १२४ कसोटी सामने आणि २३३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. एक उत्कृष्ट बॅट्समन म्हणून त्यानं कसोटीत ८८३२ धावा तर २३ शतकं बनवली आहेत. तर वनडे सामन्यात त्याच्या नावावर ८ शतकांसह ७३८१ धावा आहेत. ६६ वर्षीय मियाँदादनं तीन वेळा पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघासाठी कोच म्हणूनही काम केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.