Italy PM Georgia Melony Esakal
ग्लोबल

Italy PM Georgia Melony: मेलोनीबाईंना हवी ९० लाखांची भरपाई; इटलीच्या पंतप्रधानांचे डीपफेक व्हिडिओ, त्या पैशांचा करणार असा वापर

Deepfake Video Of Italy Pm Giorgia Meloni: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी डीपफेक व्हिडिओ प्रकरणी नुकसान भरपाई मागितली आहे. 40 वर्षीय आरोपीने त्याच्या 73 वर्षीय वडिलांसोबत मेलोनीचा व्हिडिओ एका अमेरिकन ॲडल्ट कंटेंट वेबसाइटवर पोस्ट केला होता.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Deepfake Video Of Italy Pm Giorgia Meloni: गेल्या काही दिवसांमध्ये डीपफेकचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. अनेक नेते, अभिनेते, अभिनेत्री यांचे डीपफेक व्हिडिओ देखील समोर आले आहेत. अशातच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा देखील डीपफेक व्हिडिओ समोर आला आहे. अशातच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी डीपफेक व्हिडिओ प्रकरणी नुकसान भरपाई मागितली आहे. 40 वर्षीय आरोपीने त्याच्या 73 वर्षीय वडिलांसोबत मेलोनीचा व्हिडिओ एका अमेरिकन ॲडल्ट कंटेंट वेबसाइटवर पोस्ट केला होता.

बीबीसी वृत्तसंस्थेने दलेल्या माहितीनुसार, मेलोनी पंतप्रधान होण्यापूर्वी म्हणजेच 2022 मध्ये आरोपीने डीपफेक व्हिडिओ बनवला होता. यामध्ये जॉर्जियाचा चेहरा एका ॲडल्ट फिल्म स्टारच्या चेहऱ्यावर लावण्यात आला होता. दोन्ही आरोपींविरुद्ध मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी मोबाईलद्वारे पोहोचले आरोपींपर्यंत

या प्रकरणी मेलोनींनी 1 लाख युरो म्हणजेच सुमारे 90 लाख रुपये भरपाई मागितली आहे. या प्रकरणी मेलोनी २ जुलै रोजी सासरी न्यायालयात साक्ष देणार आहेत. कथित डीपफेक व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वापरल्या गेलेल्या मोबाईल फोनद्वारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचल्याचे बीबीसीने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

भरपाई म्हणून मिळालेली रक्कम दान मेलोनी करणार दान

मेलोनीची वकील मारिया जिउलिया मारोंगीउ यांनी सांगितले की, पंतप्रधान जी भरपाई मागत आहेत ती प्रतिकात्मक आहे. अशा गुन्ह्यांना बळी पडलेल्या महिलांनी आवाज उठवण्यास घाबरू नये, हा संदेश या नुकसान भरपाईचा आहे. भरपाई मिळाल्यास, ती रक्कम हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना मदत करण्यासाठी दिला जाईल.

त्याचवेळी मेलोनीच्या टीमने जारी केलेल्या निवेदनानुसार 2022 मध्ये अपलोड केलेला हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. इटालियन कायद्यानुसार, मानहानीच्या काही प्रकरणांमध्ये गुन्हेगारी आरोप आणि संभाव्य तुरुंगवास देखील होऊ शकतो.

ऑगस्ट 2022 मध्ये जॉर्जिया मेलोनीने बलात्काराचा व्हिडिओ पोस्ट केला होता. यानंतर त्या वादात सापडल्या होत्या. हा व्हिडिओ पिसेन्झा शहरातील होता. यामध्ये एक व्यक्ती युक्रेनमधून आलेल्या एका निर्वासित महिलेवर बलात्कार करत होता. हा व्हिडिओ पोस्ट करताना मेलोनीने म्हटलं होतं की, अशा घटनांना कठोरपणे सामोरे जाईल.

काय आहे डीपफेक?

डीपफेक व्हिडिओ म्हणजे असे व्हिडिओ ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा चेहरा, आवाज, हावभाव बदलून नवीन व्हिडिओ तयार केले जातात. काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदाना, कॅटरीना कैफ, काजोल आणि अगदी सारा तेंडुलकरला देखील डीपफेक व्हिडिओंमुळे भरपूर त्रास सहन करावा लागला होता. यानंतर पंतप्रधान मोदींनी देखील डीपफेक व्हिडिओंबाबत चिंता व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT