Japan Earthquake eSakal
ग्लोबल

Japan Earthquake : जपानमध्ये भूकंपबळींची संख्या 57 वर; भीषण हानीचा ड्रोन व्हिडिओ समोर

Japan Earthquake Video : जपानला अनेक वेळा भूकंपाचा धक्का बसत असला तरीही यावेळेसच्या धक्क्याची तीव्रता अधिक असल्याने अनेक इमारती कोसळल्या. याठिकाणच्या भीषण परिस्थितीचा व्हिडिओ समोर आला आहे.

Sudesh

Japan Earthquake : जपानमध्ये सोमवारी आलेल्या भूकंपामधील बळींची संख्या 57 वर पोहोचली आहे. एनएचके वर्ल्डने याबाबत माहिती दिली आहे. यातील सर्वाधिक बळी हे वाजिमा आणि सुझू प्रांतातील असल्याचं समोर आलं आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार 20 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी आहेत, तर कित्येक नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचं बचावकार्य सुरू आहे. आणखी शक्तिशाली भूकंप होण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला आहे.

जपानच्या पश्‍चिम किनारपट्टीला सोमवारी 7.6 रिश्‍टर तीव्रतेच्या भूकंपाचा (Japan earthquake) धक्का बसला. इशिकावा प्रांताला बसलेल्या या मोठ्या धक्क्यानंतरही जपानला 50 हून अधिक मध्यम तीव्रतेचे धक्के बसले असून आजही काही धक्के जाणवले. जपानला अनेक वेळा भूकंपाचा धक्का बसत असला तरीही यावेळेसच्या धक्क्याची तीव्रता अधिक असल्याने अनेक इमारती कोसळल्या. याठिकाणच्या भीषण परिस्थितीचा व्हिडिओ समोर आला आहे.

जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सरकारने बचाव पथकांच्या मदतीला सुमारे एक हजार सैनिकांनाही पाचारण केले आहे. नागरिकांचे जीव वाचविण्यास आमचे प्राधान्य असल्याचे फुमिओ किशिदा यांनी स्पष्ट केले.

रेल्वेगाड्यांत चौदाशे प्रवासी अडकले

भूकंपामुळे जपानमध्ये काही बुलेट ट्रेन जागच्या जागी थांबवाव्या लागल्या. या रेल्वेगाड्यांमधील सुमारे 1,400 प्रवासी सुमारे 11 तास अडकून पडले होते. त्यानंतर रेल्वेसेवा पूर्ववत झाली. दरम्यानच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी सर्व प्रवाशांना अन्न-पाणी पुरविले.

वीज यंत्रणा ठप्प

भूकंपाच्या मोठ्या धक्क्यामुळे पश्‍चिम किनाऱ्यावरील अनेक गावांमधील वीज यंत्रणा ठप्प पडली आहे. इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रांतातील सुमारे 33 हजार घरांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. जपानमध्ये सध्या हिवाळा असल्याने या सर्व लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. भूकंपामुळे अनेक ठिकाणी आग लागण्याच्याही घटना घडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT