Japan Tsunami 
ग्लोबल

Japan Tsunami: पाच फुटांच्या त्सुनामी लाटा अन् रशिया-कोरियाला अ‍ॅलर्ट; भूकंपांनंतर जपानमध्ये नेमकं काय घडलंय?

एकामागून एक पाच शक्तीशाली भूकंप आल्यानं जपानमध्ये अनेक ठिकाणी त्सुनामी लाटा उसळल्या आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जपानमध्ये सोमवारी एकामागून एक पाच शक्तीशाली भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर आणखी एक ६.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा इशाराही देण्यात आला आहे. यामुळं जपानमधील शहरांमध्ये हाहाकार माजला आहे. यामध्ये समुद्राला ५ फुटांच्या त्सुनामी लाटांसह अनेक नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. (Japan Tsunami Five feet high waves Russia Korea alert what exactly happened after earthquakes)

जपान हवामान एजन्सी (JMA) अन् असोसिएट प्रेसच्या माहितीनुसार, स्थानिक हवामान संस्थांच्या म्हणण्यानुसार, भूकंपानंतर इशिगावामधील नोटोमध्ये भूकंपाच्या केंद्रापासून 300 किलोमीटर परिसरात सुनामीच्या लाटा येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार, काही भागात आलेल्या त्सुनामीच्या लाटांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

असे बसले भूकंपाचे धक्के

सोमवारी स्थानिक वेळेनुसार ४.०६ वाजता ५.७ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यांपासून सुरुवात झाली. त्यानंतर ४.१० वाजता ७.६ रिश्टर स्केल पुढे ४.१८ वाजता ६.१ रिश्टर स्केल, पुढे ४.२३ वाजता ४.५ रिश्टर स्केल, त्यानंतर ४.२९ वाजता ४.६ रिश्टर स्केल अन् दुपारी ४.३२ वाजता ४.८ रिश्टर स्केलचे धक्के जाणवले. तर अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं की, पुन्हा६.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवू शकतात. (Latest Marathi News)

त्सुनामीचा इशारा अन् लोकांना सुरक्षितस्थळी हालवलं

दरम्यान, भूकंप अन् त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर, किनारी भागात राहणाऱ्या लोकांना तात्काळ सुरक्षितस्थळी शिफ्ट होण्यास सांगितलं आहे. यामध्ये उंचच उंच इमारतींमध्ये आसरा घ्या. तसेच इशिकवारा इथल्या नोटो कोस्टइथं त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून इथं ५ मीटरपर्यंत लाटांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर जॅपनिज पब्लिक ब्रॉडकास्टरनं माहिती दिली की, जास्तीत जास्त २१ भुंकपाचे धक्के जाणवल्याचा अंदाज आहे. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, जपान मेटिरियोलॉजिकल डिपार्टमेंटनं इथं त्सुनामीच्या लाटा १ मीटरपर्यंत अनुभवल्या जाऊ शकतात असा इशारा दिला आहे. इतक्या उंचीच्या लाटांमध्ये तुम्ही धड उभंही राहू शकत नाही उलट हे जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

या भूकपांमुळं निर्माण झालेल्या त्सुनामीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाले आहेत. यामध्ये इमारती थरारताना दिसत आहेत. अनेक जण आरडाओरडा करताना दिसत आहेत. तसेच अनेक जण सुरक्षिततेसाठी खुर्च्या आणि टेबलांच्याखाली बसलेले दिसत आहेत. अनेक घर पडली आहेत तर रस्त्यांवर भेगा पडल्या आहेत.

तसेच या भुकंपांच्या झटक्यांमुळं उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, रशियाच्या पूर्व भागातील व्लादिवोस्तोक आणि नाखोद्का या शहरांसाठी त्सुनामीच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

रेल्वेसेवा, वीज सेवा ठप्प

स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, या भुकपांमुळं शिकांशेन बुलेट ट्रेनची सेवेवर परिणाम झाला असून मध्य आणि पूर्व जपानमध्ये रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. तसेच सुमारे ३४,००० घरांमधील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच जपानमधील अनेक महत्वाचे हायवे बंद झाले आहेत. तसेच इशिकावा आणि निगाटा इथं फोन आणि इंटरनेट सेवा देखील ठप्प झाल्या आहेत. तसेच या भुकंपांचा न्युक्लिअर पॉवर प्लान्ट्सवर काही परिणाम झाला आहे का? हे तपासलं जात आहे.

जपानच्या पंतप्रधानांचं जनतेला आवाहन

जपानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून त्सुनामीची मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत नेमकी माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. तसेच नुकसानाची शक्य तितके पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, जपानमधील भारतीय दुतावासानं इमर्जन्सी कन्ट्रोल रुम स्थापन केली असून याद्वारे मदतीसाठी आपले फोन क्रमांक, इमर्जन्सी क्रमांक तसेच इमेल आयडी प्रसिद्ध केले आहेत.

११ मार्च २०११ रोजी जपानमध्ये आलेल्या विध्वंसक ९ रिश्टर स्केलच्या शक्तीशाली भुकंपामुळं इशान्य किनाऱ्यावर होन्शू बेटाला त्सुनामीचा जबर फटका बसला होता. देशाच्या इतिहासातील हा सर्वात शक्तीशाली भूकंप होता. यामुळं मोठ्या त्सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. यामध्ये १८००० लोकांना जीव गमवावा लागला होता. यामुळं प्रभावित भागाला न्युक्लिअर इमर्जन्सी घोषित करण्यात आली होती. इथल्या अणुभट्ट्याचं यामुळं मोठं नुकसान झालं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

त्याने कधीही माझ्यावर शंका... मृणाल दुसानिसने पतीच्या त्या गोष्टीचं केलं कौतुक, म्हणाली- माझ्याबद्दल पझेसिव्ह असणं

Latest Marathi News Updates live : पुण्यात मित्र पक्षाला एकत्र घेत महायुतीची रणनीती ठरली

Swiggy IPO: स्विगीचा 11,327 कोटी रुपयांचा IPO उघडला; गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचे मत?

IPL Mega Auction 2025: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांच्यासह २३ भारतीय खेळाडू २ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये; कोणाला हाय डिमांड?

SCROLL FOR NEXT