अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर अडखळले आणि घसरुन पडले. कोलोरॅडोमध्ये यूएस एअर फोर्सच्या पदवीदान समारंभात ही घटना घडली. अखेरची पदवी दिल्यानंतर बायडेन आपल्या जागेकडे जात होते. यावेळी जाताना त्यांचा पाय वाळूज्या पिशवीवर पडला अन् ते घसरले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बायडेन यांना दुखापत झाली नाही. मात्र, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष बायडेन ठीक आहेत.
सॅन्डबॅगमध्ये बायडेन यांचा पाय अडकला होता
या कार्यक्रमाच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बायडेन उभे राहताच त्यांनी बोटाने स्टेजकडे इशारा केला. तेथे काळ्या रंगाची वाळूने भरलेली पिशवी होती. यामध्ये बायडेन यांचा पाय अडकला होता.
बायडेन हे अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष
बायडेन हे अमेरिकेत अध्यक्षपद भूषवणारे सर्वात वयस्कर नेते आहेत. 80 वर्षीय डेमोक्रॅट नेत्याने 20 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून त्यांनी अमेरिकेची सत्ता मिळवली होती. 2024 मध्ये ते पुन्हा निवडणूक लढवणार आहेत.
यापूर्वी पाचवेळा ते खाल कोसळले होते. व्हाईट हाऊसचे कम्युनिकेशन डायरेक्टर बेन लाबोल्ट यांनी ट्विट केले की अध्यक्ष ठीक आहेत आणि त्यांना दुखापत झाली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.