Hunter Biden esakal
ग्लोबल

Hunter Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या मुलाला होणार 25 वर्षांचा तुरुंगवास? बेकायदा बंदूकप्रकरणात ठरला दोषी

Amit Ujagare (अमित उजागरे)

न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन बेकायदा बंदूक बाळगल्याच्या तिन्ही गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला आहे. बंदुक खरेदी करताना अंमली पदार्थांच्या वापराबद्दल खोटं बोलल्याबद्दल ज्युरीनं हंटर बायडनला दोषी ठरवलं. या तिन्ही गुन्ह्यांसाठी त्याला 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद आहे. पण अद्याप ही शिक्षा कोर्टानं सुनावलेली नाही, लवकरच ती सुनावली जाऊ शकते. (Joe Bidens son Hunter found guilty of gun crimes faces up to 25 years in jail)

असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, हंटर बायडनला पहिल्या गुन्ह्यासाठी 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दुसऱ्या गुन्ह्यासाठी पाच वर्षे आणि तिसऱ्या गुन्ह्यासाठी आणखी 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. या प्रकरणी 12 सदस्यीय ज्युरीमध्ये सोमवारी चर्चा पार पडली. यानंतर विल्मिंग्टन, डेलावेअर येथील फेडरल कोर्टाने मंगळवारी हंटर बायडनला दोषी ठरवलं. पण न्यायाधीशांनी हंटरच्या शिक्षेची तारीख निश्चित केली नाही, परंतू १२० दिवसांच्या आत ही शिक्षा सुनावली जाऊ शकते. त्यामुळं 5 नोव्हेंबरच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ही शिक्षा सुनावली जाणार आहे.

विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि हंटर यांचे वडील हे एव्हरीटाउन गन सेफ्टी ॲक्शन फंडासाठी आयोजित केलेल्या परिषदेत भाषण करणार आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

हंटरनं ऑक्टोबर २०१८ मध्ये डेलावेअरच्या कॉल्ट कोब्रा या हत्यारांच्या खास दुकानातून बंदूक खरेदी केली होती. बंदूकीची खरेदी करताना त्यांनं जे फॉर्म भरले त्यात खोटी माहिती दिली होती. आपण ड्रग्जचा व्यसनी नसल्याचं त्यानं यात म्हटलं होतं पण खरंतर तो ड्रग्जचा व्यसनी असल्याचं उघड झालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT