Julian Assange sakal
ग्लोबल

Julian Assange : ज्युलिअन असांजे तुरुंगातून मुक्त; १ तपानंतर ऑस्ट्रेलियात कुटुंबाला भेटणार

सकाळ वृत्तसेवा

लंडन : हेरगिरीचा आरोप झाल्यानंतर मागील दशकभरापासून अमेरिकेत हस्तांतर होण्याविरोधात लढा देणारे ‘विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांजे यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली आहे.

हेरगिरीच्या गुन्ह्याची कबुली देण्याचा अमेरिकेने दिलेला प्रस्ताव असांजे यांनी मान्य केल्यानंतर लंडनमधील तुरुंगातून त्यांना मुक्त करण्यात आले असून, आता ते ब्रिटनच्या बाहेरही गेले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गोपनीय असलेली कागदपत्रे मिळविण्यासाठी हेरगिरी केल्याचा असांजे यांच्यावर आरोप होता.

त्यांच्यावरील आरोपांपैकी हेरगिरीचा आरोप कबूल करण्याच्या बदल्यात त्यांना मुक्त करण्याची अट अमेरिकेने घातली होती. असांजे हे लंडनच्या तुरुंगात ६२ महिने होते. असांजे यांच्या सुटकेबाबत अमेरिकेच्या न्याय विभागाबरोबर चर्चा होऊन त्यांना शनिवारीच तुरुंगातून मुक्त केल्याचे आणि ते ऑस्ट्रेलिया या आपल्या मायदेशाकडे रवाना झाल्याचे आज जाहीर करण्यात आले.

असांजे यांच्या सुटकेमुळे सुमारे बारा वर्षांनंतर ते घरी परतणार आहेत. त्यांची पत्नी स्टेला आणि अपत्ये काही दिवस आधीच ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहेत. असांजे यांच्या सुटकेनंतर ‘विलिलिक्स’ने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘‘पाच वर्षांहून अधिक काळ दोन बाय तीन मीटरच्या खोलीत दिवसाचे २३ तास एकट्याने काढल्यानंतर ज्युलियन हे अखेर आपल्या पत्नीला आणि मुलांना भेटणार आहेत. मुलांनी त्यांच्या वडिलांना केवळ तुरुंगामध्येच पाहिले आहे,’’ असे ‘विकिलिक्स’ने म्हटले आहे.

अशी झाली सुटका

मागील महिन्यात लंडनमधील दोन न्यायाधीशांनी निकाल देताना, असांजे यांना हस्तांतरविरोधात अपील करण्याची परवानगी दिली. अमेरिकेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याअंतर्गत असांजे यांना संरक्षण मिळावे आणि मृत्युदंडाची शिक्षा देऊ नये, अशी मागणी अमेरिकेने मान्य केली.

त्यामुळे हेरगिरी झाल्याची कबुली दिल्यास सुटकेस मान्यता देण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव असांजे यांनी मान्य केला आणि त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा करण्यात आला. यानंतर आता ते कबुली दिलेल्या गुन्ह्यात माफी द्यावी, अशी विनंती करणार असल्याचे समजते.

आश्रय, अटक व सुटका

ज्युलियन असांजे यांनी २००६ मध्ये ‘विकिलिक्स’ची स्थापना केली होती. त्यामाध्यमातून त्यांनी तिबेटमधील असंतोष, केनियातील राजकीय हत्या असे विविध मुद्द्यांना तोंड फोडले होते. हे करताना त्यांनी अनेक गोपनीय कागदपत्रे हस्तगत केली होती.

२०१० मध्ये त्यांनी अमेरिकेच्या इराकमधील कारवाईबाबतची गोपनीय माहिती उघड केल्यानंतर ते जागतिक पातळीवर ओळखले जाऊ लागले. अमेरिकेने त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप केला होता. स्वीडनमध्ये असताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आणि याच प्रकरणात जामिनाच्या नियमाचा भंग केल्याने त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली.

अमेरिकेकडे हस्तांतर टाळण्यासाठी त्यांनी २०१२ मध्ये लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला. मात्र, इक्वेडोरने हा आश्रय काढून घेतला आणि लंडन पोलिसांनी २०१९ मध्ये त्यांना अटक केली. तेव्हापासून ते लंडन पोलिसांच्या ताब्यात होते.

ज्युलिअन मुक्त झाला आहे. लोकांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. तुम्ही लोकांनीच ज्युलिअनची बाजू लावून धरली होती.

- स्टेला असांजे, ज्युलिअन असांजे यांच्या पत्नी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharatvakya Book Publication : ‘भरतवाक्य’चे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

Sharad Pawar Video : "८४ होवो, ९० होवो हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

कोअर कमिटीची 4 तास बैठक; भाजप उमेदवार कधी निश्चित करणार? मिटींगनंतर तारीख सांगितली, जाणून घ्या...

अतुल यांच्या निधनानंतर व्हायरल होतोय त्यांचा जगणं शिकवणारा व्हिडिओ; म्हणालेले- समोरच्यासाठी आपण काय आहोत...

IAS Promotion: राज्यातील 23 अपर जिल्हाधिकारी बनले 'आयएएस'; पुण्यातील 4 जणांचा समावेश

SCROLL FOR NEXT