Justice For Jaahnavi eSakal
ग्लोबल

US : 'तिची एवढी किंमत नव्हती', भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूवर अमेरिकेतील पोलिसाचं असंवेदनशील वक्तव्य; व्हिडिओ व्हायरल

Justice For Jaahnavi : या व्हिडिओनंतर सोशल मीडियामध्ये जस्टिस फॉर जाह्नवी हा हॅशटॅग ट्रेंड होतो आहे.

Sudesh

US Police : जानेवारी महिन्यात अमेरिकेत एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. एका पोलिसाच्या वाहनाखाली येऊन या मुलीला आपला प्राण गमवावा लागला होता. आता याबाबत सिएटलमधील एका पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी या विद्यार्थिनीच्या मृत्यूबाबत चेष्टा-मस्करी करत आहे.

मूळची तेलंगणाची असणारी जाह्नवी कंडुला ही विद्यार्थिनी अमेरिकेतील साउथ लेक युनियन येथे असणाऱ्या नॉर्थ-इस्टर्न विद्यापीठात शिक्षण घेत होती. जानेवारीमध्ये रस्ता ओलांडत असताना एका भरधाव पोलीस वाहनाने तिला धडक दिली होती. यात तिचा मृत्यू झाला होता. तपासात असं दिसून आलं होतं, की हा पोलीस तब्बल 110 किलोमीटर प्रतितास वेगाने गाडी चालवत होता.

याप्रकरणी अधिक तपास सुरू असतानाच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये सिएटल पोलीस ऑफिसर्स गिल्डचे व्हाईस प्रेसिडेंट डॅनियल ऑडेरर असल्याचं स्थानिक माध्यमांनी सांगितलं आहे. फोनवर बोलत असणारे डॅनियल हे अगदी असंवेदनशील वक्तव्य करत आहेत.

"तिची (जाह्नवीची) एवढी किंमत नव्हती. ती आता मेली आहे. ती फक्त एक साधारण नागरिक होती. तिच्यासाठी एक 11,000 डॉलर्सचा चेकही पुरेसा होता. असंही ती फक्त 26 वर्षांची होती, तिची जास्त किंमत नव्हती.." धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण संभाषणात डॅनियल किती तरी वेळा हसत आहे.

अधिक तपासाची मागणी

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर जगभरातून संताप व्यक्त केला जातो आहे. सॅन फ्रॅन्सिस्कोमधील भारतीय काऊन्सिलने हा व्हिडिओ अतिशय दुःखद असल्याचं म्हणत, आम्ही याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांकडे तपासाची मागणी केली असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT