दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या राजधानीतील गुरुद्वारामध्ये गोळीबार केलाय.
इस्लामिक स्टेटच्या (IS) दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या (Afghanistan) राजधानीतील गुरुद्वारामध्ये गोळीबार (Terrorist Attack Gurudwara) केला असून यात एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झालाय. तर, दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याशिवाय 7 ते 8 लोक अजूनही गुरुद्वारामध्ये अडकले आहेत. काबूलमधील कार्ट-ए-परवान गुरुद्वारामध्ये हा गोळीबार झालाय. सध्या सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांशी चकमक सुरूय.
भाजपच्या नेत्यानं पैगंबर मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर अशा हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या इस्लामिक स्टेट खोरासान (Islamic State Khorasan) प्रांताच्या मीडिया विंगनं एक व्हिडिओ जारी केलाय. 2020 गुरुद्वारा हल्ल्याची पुनरावृत्ती होईल, असं त्यात म्हटलंय.
ऑगस्ट 2021 मध्ये तालिबाननं काबूलवर ताबा घेतल्यापासून शीख समुदाय दहशतवादी हल्ल्यांना बळी पडत आहे. भारतानं कार्ट-ए-परवान शिखांना बाहेर काढण्यासाठी पाठिंबा देऊ केला होता. मार्च 2020 मध्ये काबूलच्या शॉर्ट बाजार भागातील श्री गुरु हर राय साहिब गुरुद्वारावर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात 27 शीख ठार झाले आणि अनेक जखमी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.