नवी दिल्ली : काठमांडूहून दुबईला निघालेल्या विमानाला उड्डाणादरम्यान आग लागली होती. या विमानानं नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाणानंतर पक्ष्याच्या धडकेमुळं लगेचच हा प्रकार घडला होता. पण आता हे विमान दुबईच्या विमानतळावर सुरक्षिरित्या लँड झालं आहे. यामध्ये १२० प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. (Kathmandu Dubai Flight Fire Safe landing in Dubai with 120 passengers)
या विमानातून एकूण १२० प्रवासी प्रवास करत होते त्यांपैकी ५० परदेशी प्रवास असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. हे बोईंग 7373-800 प्रकारचं विमान असून त्याच्या एका इंजिनला आग लागली तरी दुसऱ्या इंजिनच्या मदतीनं ते लँड करु शकतं त्यामुळं विमानाची दुबई विमानतळाकडे कूच सुरु असल्याची माहिती नेपाळच्या सिव्हिल एव्हिएशन ऑथरिटीनं दिली आहे. विमान दुबईच्या दिशेनं निघाल्याचं ऑथिरिटीनं सांगितलं. यानंतर आता ते सुरक्षितरित्या लँडिंग झालं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.