Kenya Protest Against Tax
Kenya Protest Against Tax Esakal
ग्लोबल

Kenya Tax Protest: केनियामध्ये करविरोधी आंदोलनात 39 ठार, भारतीय दुतावासाने उचलले मोठे पाऊल

आशुतोष मसगौंडे

केनियामध्ये नुकत्याच झालेल्या नवीन करवाढीविरोधात झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये किमान 39 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, असे अल जझीराने नॅशनल राइट्स वॉचडॉगचा हवाला देत सांगितले आहे.

दरम्यान करवाढ आता मागे घेण्यात आली असली तरी कर वाढींच्या विरोधात निदर्शने करताना मारल्या गेलेल्या लोकांसाठी सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या आकडेवारीच्या जवळपास दुप्पट ही नवी आकडेवारी आहे.

दरम्यान भारताने केनियामधील आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कारण कर वाढीच्या विरोधात निदर्शने हिंसक बनली आहेत, ज्यामुळे केनियामध्ये खळबळ उडाली आहे.

केनियातील भारतीय दूतावासाने यापूर्वी तेथील भारतीय नागरिकांना "सावधगिरी बाळगावी, अत्यावश्यक नसलेल्या हालचालींवर मर्यादा घालाव्यात आणि परिस्थिती पूर्ण होईपर्यंत निदर्शने आणि हिंसाचारामुळे प्रभावित झालेले क्षेत्र टाळावे" असा सल्ला दिला होता.

(बातमी अपडेट होत आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India’s Jersey: काय सांगता? टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठी चूक? वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणीच दिले नाही लक्ष

Sharad Pawar : शरद पवार विधानसभेच्या कामाला! पुण्यात दोन माजी आमदारांनी घेतली पवारांची भेट

Mahayuti Sarkar: महाराष्ट्राला गतिशील करण्याचा आमच्या सरकारचा संकल्प; आ. रणधीर सावरकरांचा दावा

Police Bharti : पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत धावताना तरुणाचा मृत्यू; पोलिस मुख्यालयातील घटना

Devendra Fadnavis : ''प्रवक्त्यांना फारच खुमखुमी असेल तर...'', महायुतीच्या मेळाव्यात फडणवीसांनी वाचाळवीरांना फटकारलं

SCROLL FOR NEXT