khalil haqqani khalil haqqani
ग्लोबल

अमेरिकेकडून ३७ कोटींचे इनाम असलेला दहशतवादी फिरतोय काबूलच्या रस्त्यावर

तसेच काही दहशतवादी नाचताना, गार्डनमध्ये फिरताना तर काही जण पार्कमध्ये जाऊन तिथे फिरताना दिसत आहेत

प्रमोद सरवळे

तसेच काही दहशतवादी नाचताना, गार्डनमध्ये फिरताना तर काही जण पार्कमध्ये जाऊन तिथे फिरताना दिसत आहेत

काबुल: अफगाणिस्तान (Afghanistan) जेंव्हापासून दहशतवादी संघटना असणाऱ्या तालिबानच्या (Taliban) ताब्यात आले आहे तेंव्हापासून तिथे दहशतवादी बंदुकीसह रस्त्यावर निवांत फिरताना दिसत आहेत. तसेच काही दहशतवादी नाचताना, गार्डनमध्ये फिरताना तर काही जण पार्कमध्ये जाऊन तिथे फिरताना दिसत आहेत. रस्त्यावरील दहशतवादी हातात बंदुकी घेत लोकांना धमकावत आहेत. तसेच तालिबानी दहशतवादी यापूर्वी अमेरिकेन सैन्यांना मदत करणाऱ्यांना शोधून मारत आहेत. या दरम्यानच अमेरिकेला हवा असणारा मोस्ट वान्टेड दहशतवादी खलील हक्कानी (Khalil Haqqani) काबूलमधील रस्त्यावर फिरताना दिसला आहे. हक्कानीच्या डोक्यावर सध्या ५ दशलक्ष डॉलरचा ( ३७ कोटींपेक्षा जास्त) इनाम आहे.

दहशतवादी खलील हक्कानी मशिदीत शपथ-

शनिवारी सकाळी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हक्कानीने काबुलच्या पुल-ए-खिश्ती मशिदीमध्ये सुमारे 100 लोकांना तालिबानच्या निष्ठेची शपथ दिली. मशिदीतील इमामच्या युक्तिवादानंतर दहशतवादी खलील हक्कानी म्हणाला की, आमची प्राथमिकता अफगाणिस्तानची सुरक्षा असणार आहे.

खलील हक्कानीचे वचन-

न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, दहशतवादी खलील हक्कानी म्हणाला की, सुरक्षेशिवाय जीवन नाही. आम्ही अफगाणिस्तानला संरक्षण देऊ. तसेच आम्ही अफगाणिस्तानच्या लोकांना व्यवसाय आणि शिक्षण देऊ. यापूढे महिला आणि पुरुष असा भेदभाव केला जाणार नाही. मशिदीतील हक्कानीचे भाषण संपल्यानंतर तिथे उपस्थित लोकांनी तालिबान आणि हक्कानी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. खलील हक्कानीचा संबंध हक्कानी नेटवर्कशी आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या विस्तारात हक्कानी नेटवर्कची मोठी भूमिका आहे.

खलील हक्कानी कोण आहे?

हक्कानी नेटवर्कची स्थापना १९७० साली जलालुद्दीन हक्कानी याने केली होती. हक्कानी नेटवर्कने ओसामा बिन लादेनला २००१ मध्ये तारा बोरापासून पळून जाण्यास मदत केल्याचे सांगितले जाते. यामध्ये खलील हक्कानीचा मोठा भाग होता, असंही सांगितले जाते. खलील हक्कानी हा हक्कानी नेटवर्कचा संस्थापक जलालुद्दीन हक्कानीचा भाऊ आहे. खलील हक्कानी दहशतवादी संघटनेसाठी निधी गोळा करण्याचे काम करतो. हक्कानी हे तालिबानचा उपनेते सिराजुद्दीन हक्कानीचा काका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात बंडखोरांकडून आव्हान उभे; पाचही मतदारसंघांत मतविभाजनाचे डावपेच

Meesho: आता टी-शर्टवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो... मीशोवर नेटकऱ्यांचा संताप! कंपनीनं काय दिलं स्पष्टीकरण?

Kartiki Yatra : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू राहणार

अखेर भुलभुलैय्या 3 ने सिंघम अगेनला टाकलं मागे; बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये कार्तिकच ठरला अजयपेक्षा सरस

Nashik Vidhan Sabha Election : बंडखोरांच्या तलवारी म्यान; बहुतांश बहुरंगी लढती

SCROLL FOR NEXT