Hardeep Singh Shot Dead 
ग्लोबल

Hardeep Singh Shot Dead: कॅनडात खालिस्तानी आतंकी हरदीप सिंह निज्जरची हत्या

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून हत्या

धनश्री ओतारी

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोल आली आहे. कॅनडातील सरे येथील गुरु नानक सिंग गुरुद्वारामध्ये दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या केली. (Khalistani terrorist Hardeep Singh Nijjar shot dead in Canada)

निज्जर हा कॅनडातील शीख फॉर जस्टिसचे (एसएफजे) प्रमुख होता. हरदीपसिंग निज्जर हा खलिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुख होता आणि तो कॅनडात बसून भारताविरुद्ध देशविरोधी कारवाया करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडातील गुरू नानक शीख गुरुद्वारा सरेजवळ दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी निज्जरची गोळ्या झाडून हत्या केली. निज्जर या गुरुद्वाराचे प्रमुखही होते. शीख फॉर जस्टिस (SFJ) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्याही तो जवळचा होता.

निज्जरवर 10 लाखांचे बक्षीस होते

खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीपसिंग निज्जर कॅनडात बसून संघटना चालवत होता. सप्टेंबर 2020 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने हरदीप निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. यानंतर निज्जरची जालंधरच्या भरसिंग पुरा गावातील मालमत्ताही जप्त करण्यात आली. निज्जरने याच गावातील पुजाऱ्याची हत्या केली होती. याद्वारे तो पंजाबमध्ये धार्मिक उन्माद पसरवण्याचा प्रयत्न करत होता. एनआयएने निज्जरवर १० लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते.

4 महिन्यांपूर्वी दहशतवादी घोषित करण्यात आले होते

केंद्रीय गृह मंत्रालयाने 4 महिन्यांपूर्वी निज्जरच्या केटीएफ संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. गृहमंत्रालयाने म्हटले होते- “खलिस्तान टायगर फोर्स ही कट्टरतावादी संघटना आहे. ज्यांचा उद्देश पंजाबमध्ये पुन्हा दहशतवाद पसरवण्याचा आहे. पंजाबमधील टार्गेट किलिंगमागेही या संघटनेचा हात आहे. ही संघटना भारताच्या प्रादेशिक अखंडता, एकता, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला आव्हान देत असल्याचे गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT