Operation sakal
ग्लोबल

मानवाला डुक्कराच्या किडनीचं दान; अमेरिकेत यशस्वी प्रत्यारोपण

ओमकार वाबळे

अवयव प्रत्यार्पणाची प्रक्रिया वेगवेगळ्या पेशंट्समध्ये होताला आपण पाहतो. एखादा अवयव निकामा झाला की त्याजागी नव्याने अवयव बसवता येतो. मात्र, माणसाचा अवयव निकामी झाल्यानंतर त्याजागी प्राण्याचा अवयव बसवता येतो, हे ऐकल्यावर तुम्हालाही नवल वाटेल. चक्क माणसाला डुक्कराची किडनी बसवण्याचा प्रकार अमेरिकेत घडला आहे.

न्यूयॉर्कमधील शल्यचिकित्सकांनी यशस्वीरित्या डुक्कराची किडनी माणसात बसवली आहे. अनुवांशिकरित्या बदललेल्या डुक्करात किडनी विकसित करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. यानंतर ही डुक्कराची किडनी सामान्यपणे कार्य करत असल्याचे आढळले. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक पाऊल पडले आहे. त्यामुळे गंभीर आजारी रुग्णांसाठी अवयवांचा मोठा नवीन पुरवठा होऊ शकतो.

प्रत्यारोपणाच्या दीर्घकालीन परिणामांविषयी अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहे. यामध्ये मेंदू प्रत्यारोपणाचा विषय महत्वाचा आहे. याआधी एका माणसाला मेंदू बसवण्यात आला होता. मात्र, तो केवळ 54 तास काम करू शकला. परंतु या क्षेत्रातील तज्ञांनी सांगितले की, ही प्रक्रिया म्हणजे माईलस्टोन आहे.

जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसिनमधील प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे प्राध्यापक डॉ.डोरी सेगेव म्हणाले, “आम्हाला अवयवाच्या दीर्घायुष्याबद्दल अधिक माहिती असणे आवश्यक आहे. मात्र, मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण ही एक मोठी प्रगती आहे.

माणसांमध्ये प्रत्यारोपणासाठी योग्य असलेल्या अवयवांची डुक्करांमध्ये कृत्रिम पद्धतीने वाढ करता येते. यासाठी संशोधकांनी बराच काळ प्रयत्न केला आहे. येणाऱ्या काळात अवयवांमध्ये हृदय, फुप्फुसे आणि यकृत यांचा समावेश असू शकतो. सध्या अमेरिकेतील 100,000 हून अधिक लोकांना अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे. यासाठी ते वेटिंग लिस्टमध्ये आहेत. यात 90,240 जणांना मूत्रपिंडाची गरज आहे. या वेटिंग लिस्टमधील बारा माणसं दररोज मरतात. पण येणाऱ्या काळात या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यास अशा व्यक्तींना दीर्घ आयुष्य मिळू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मोहोळमध्ये राजू खरे 29528 मतांनी आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT