नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक श्रीमंतर व्यक्ती आणि अमेझॉन कंपनीचे सीईओ जेफ बेजोस अंतराळात प्रवासासाठी जाणार आहेत. त्यांच्या या अंतराळ प्रवासामध्ये त्यांच्यासोबत येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी त्यांनी अंतराळ यानातील उपलब्ध जागांचा लिलाव केला आहे. यामध्ये जवळपास 159 देशांतील 7600 लोकांनी सहभाग नोंदवला. गेल्या आठवड्यात जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांनी घोषणा केली होती की, ते आपली कंपनी ब्लू ओरिजीनच्या पहिल्या फ्लाईटमधून अंतराळात प्रवासासाठी जाणार आहेत. त्यांनी आपल्या इतर प्रवाशांसाठी अंतराळ यानाच्या जागेचा लिलाव केला आहे. त्यांच्या अंतराळ यानातील एका जागेचा लिलाव झाला. ब्लू ओरिजीनने याबाबत खुलासा करत म्हटलंय की, एका जागेचा लिलाव 28 मिलीयन डॉलर (204.4 कोटी) मध्ये केला गेला आहे.
लिलाव जिंकणारे 20 जुलै रोजी पहिल्या मानवी फ्लाईटमधून अंतराळ प्रवासासाठी जाणार आहेत. ब्लू ओरिजीनने म्हटलंय की, जवळपास 159 देशांतील 7600 लोकांनी लिलावासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. कंपनीने म्हटलंय की या लिलावातून प्राप्त झालेली रक्कम ब्लू ओरिजीन फाउंडेशन, फ्यूचर क्लबमध्ये दान केली जाईल. याचा उद्देश स्टेममध्ये प्रगती करण्यासाठी येणाऱ्या भविष्यातील पिढ्यांना प्रेरित करणे आणि स्पेसमध्ये जीवनाची शक्यता धुंडाळण्यासाठी मदत केली जाईल.
ब्लू ओरिजीनने हा लिलाव जिंकणाऱ्याचं नाव जाहिर केलं नाहीये. मात्र, असं सांगितलं गेलंय की, लिलावाची प्रक्रिया संपल्यानंतर सर्वाधिक बोली लावणाऱ्याचं नाव घोषित केलं जाईल. तेंव्हा चौथ्या आणि शेवटच्या क्रू मेंबरची घोषणा केली जाईस. एकूण चार लोक अंतराळ यानातून प्रवासास जाणार आहेत. यामध्ये बेजोस ब्रदर्स देखील असणार आहेत. बेजोस यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं की, ते या फ्लाईटमधून जाऊ इच्छित आहेत कारण ते आयुष्यात काहीतरी करु इच्छित आहेत. अनेक रिपोर्ट्समध्ये त्यांनी म्हटलंय की, अंतराळातून तुम्ही पृथ्वीला पाहू शकता आणि यामुळे तुमच्यात खूप परिवर्तन होईल. यामुळे या ग्रहाशी, मानवतेशी असलेलं आपलं नातं बदलेल. बेजोस यांनी म्हटलंय की, या फ्लाईटमधून प्रवास करणं हे माझं आयुष्यभराचं स्वप्न आहे. हे माझ्यासाठी मोठं काम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.