काटमांडू- नेपाळमध्ये नवे सरकार आलं आहे. कम्युनिस्ट नेता केपी शर्मा ओली हे नवे पंतप्रधान झाले आहेत. त्यांनी तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. केपी शर्मा ओली यांना चीन समर्थन मानले जाते. याचा अर्थ केपी ओली पंतप्रधान झाल्याचे परिणाम भारत-नेपाळ संबंधावर पाहायला मिळणार आहेत.
केपी ओली यांचे भारतासोबतचे संबंध काहीशे आपल्या विरोधी आहेत. त्यांनी भारताचे अनेक भूभाग नेपाळच्या नकाशामध्ये दाखवले होते. यावरून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. ओली हे तीनवेळा पंतप्रधान झालेत. ऑक्टोबर २०१५ ते ऑगस्ट २०१६ या काळात पहिल्यांदा आणि फेब्रुवारी २०१८ ते जुलै २०११ अशा काळात त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळला आहे.
ओली यांचा दुसरा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी त्यांची केलेली नियुक्ती सुप्रीम कोर्टाने असैंविधानिक ठरवली होती. त्यामुळे त्यांना पायउतार व्हावं लागले होते. पण, त्यांनी पुन्हा सत्ता स्थापन करण्यात यश मिळवलं आहे. केपी ओली यांनी शेर बहादुर देऊबा यांच्या नेपाली काँग्रेस पार्टीच्या पाठिंब्याने नवे सरकार स्थापन केले आहे.
राष्ट्रपतींनी केपी. ओली यांना विश्वास दर्शक ठराव सिद्ध करण्यात सांगितले होतं. नेपाळची संसद २७५ सदस्यांची आहे. यातील १६५ सदस्यांनी त्यांच्या नव्या सरकारच्या बाजूने समर्थन दिलं आहे. ओली यांची नवी कारकीर्द भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. २०१५ मध्ये पहिल्यांदा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी भारताविरोधात काही निर्णय घेतले होते.
नेपाळच्या संविधानाच्या मुद्द्यावरून भारत सीमेलगत तणाव निर्माण झाला होता. यावेळी कठोर नाकेबंदी करण्यात आली होती. यावरून ओली भडकले होते. त्यांनी चीनसोबत संबंध वाढवण्यावर भर दिला होता. नेपाळने देशाचा नवा नकाशा जाहीर केला होता. यात त्यांनी उत्तराखंडमधील लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हे नेपाळचे भाग म्हणून दाखवले होते. भारताने नेपाळचा दावा खोडून काढला होता. तिन्ही प्रदेश भारताचेच असल्याचं सरकारने ठासून सांगितलं होतं.
नेपाळने अनेक अस्थिर सरकार पाहिले आहेत. नेपाळमध्ये २००८ मध्ये राजेशाही संपली. त्यानंतर आतापर्यंत तब्बल १३ सरकारे स्थापन झालेले आहेत. केपी ओली ७२ वर्षांचे आहेत. त्यांच्याकडून नेपाळच्या जनतेला भार अपेक्षा आहेत. पण, त्यांच्याकडे देखील संसदेत चांगल्या जागा नाहीत. त्यांचा स्वत:च्या पक्ष सीपीआय-यूएमएमला ७७ जागा आहेत, ८८ सदस्य नेपाली काँग्रेस पार्टीचे आहेत. एकंदरीत अजूनही सरकार स्थिर असण्याची शक्यता नाही. दोन्ही पक्षात झालेल्या करारानुसार प्रत्येकी १८ महिन्यांसाठी पंतप्रधानपदी राहण्याचं ठरलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.