टोकीयो : जपानमध्ये एका कायद्याअंतर्गत पती आणि पत्नीला एकच आडनाव ठेवणं आवश्यक आहे. जर लग्नाआधी दोघांचे आडनाव वेगवेगळे असतील तर लग्नानंतर दोघांपैकी कुणाला एकाला तरी समजुतीने दुसऱ्याचे आडनाव आपल्या नावासमोर लावणे अनिवार्य आहे. मात्र, आता तिथे राहणाऱ्या जोडप्यांना या अटीपासून सुटका मिळण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान सुगा यांनी दिलं आश्वासन
जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी आपल्या देशातील जनतेला हे आश्वासन दिलंय की ते या कायद्यात बदल करणार आहेत. तसेच या बदलासाठी ते त्यांच्यापरीने सर्व प्रयत्न करतील. या 'एक आडनाव अटी'मुळे जास्तकरुन ठिकाणी पत्नीलाच माघार घेत आपले नाव बदलावे लागत आहे, असा एक अभ्यास सांगतो. तिला तिचे नाव बदलून पतीचे आडनाव आपल्या नावापुढे जोडावे लागते.
भारतात देखील सामान्यत: परंपरेने पत्नीलाच आपलं आडनाव बदलून पतीचे आडनाव स्विकारावे लागते. काही ठिकाणी तर पत्नीचे नाव देखील बदलण्यात येते. मात्र, भारतात नाव-आडनावांसदर्भात असा काही ठोस कायदा नाहीये. पती आणि पत्नी त्यांच्या मूळ नाव-आडनावासोबत एकत्र राहू शकतात. शिवाय ते बदलूही शकतात.
मात्र, जपानमध्ये आता या प्रकाराला आळा घालण्यासाठी पावले उचलली जात आहेत. 'एकच आडनाव असायला हवं' या कायद्याला महिलाविरोधी कायदा म्हणून ओळखलं जात आहे. याशिवाय महिलांच्या विरोधातील हिंसेला रोखण्यासाठी बनलेल्या संयुक्त राष्ट्राची समितीनेदेखील जपानमधील या निर्णयाचे स्वागत केलं आहे. अलिकडेच जपानमध्ये एक सर्व्हे केला गेला आहे. यामध्ये हा खुलासा केला गेलाय की, जपानमध्ये अधिकतर लोक लग्नानंतर आपले आडनाव आहे तसेच ठेवण्याच्या बाजूने आहेत.
हेही वाचा - जो बायडन यांच्या राष्ट्रीय सुरक्षा दलात तीन महिलांचा समावेश
मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व्हेमध्ये 60 वर्षांहून कमी वयाच्या लोकांना आडनाव बदलण्याच्या अटीबाबत विचारले गेले. यामधील 70.6 टक्के लोकांनी म्हटलं की, त्यांच्या जोडीदाराचे आडनाव वेगळे राहिले तर त्यांना कसलीही अडचण नाहीये. तर आजही 14.4 टक्के लोकांना असं वाटतं की पती आणि पत्नीचे आडनाव एकच असायला हवं.
जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांचा निर्णय त्यांचा स्वत:चा पक्ष एलडीपीहून वेगळा आहे. त्यांच्या पक्षात अनेक पारंपारिक मानसिकतेचे लोक आहेत, जे या कायद्यांमधील बदलांच्या विरोधात आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की, पती आणि पत्नी यांच्या वेगवेगळ्या आडनावामुळे कुंटुंबाच्या एकात्मतेवर परिणाम होतो. मात्र, विरोधी पक्षाने पंतप्रधानांच्या या निर्णयाचे स्वागतच केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.