China Under Xi Jinping esakal
ग्लोबल

China Under Xi Jinping : दाढी वाढवल्याबद्दल मुस्लिमांना तुरुंगात टाकणारा कायदा.. जिनपिंग यांच्या चीन मध्ये हुकूमशाही सुरू आहे का?

चीनमध्ये आयफोनवर बंदी घालण्यात आली आहे

सकाळ डिजिटल टीम

China Under Xi Jinping : चीनमध्ये आयफोनवर बंदी घालण्यात आली आहे. कपड्यांबाबत नवा कायदा आणण्याची तयारी सुरू आहे. जिनपिंग यांच्या काळात असे अनेक कायदे करण्यात आले जे धक्कादायक आहेत. जिनपिंग यांच्या हुकूमशाही राजवटीत कोणते विचित्र कायदे लागू केले जातात ते जाणून घ्या.

चीन आपल्या हुकूमशाही वृत्तीसाठी ओळखला जातो. त्याचे मित्र कमी पण शत्रूंची यादी खूप मोठी आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ही यादी आणखी पुढे वाढवली आहे. जिनपिंग यांची हुकूमशाही हे त्यांच्या विरोधाचे कारण ठरले आहे. मग ते देशातील लोकांमध्ये असो वा जागतिक स्तरावर. आता चीनने अमेरिकन टेक आणि परदेशी कंपन्यांना लक्ष्य केल आहे.

सरकारी एजन्सीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी अॅपल आणि परदेशी कंपन्यांचे फोन वापरू नयेत, असा आदेश चीनने जारी केला आहे. त्यांना कार्यालयात आणण्यासही बंदी आहे. एवढेच नाही तर चॅट ग्रुप आणि मीटिंगसाठी परदेशी कंपन्यांचे प्लॅटफॉर्म वापरू नका असेही सांगण्यात आले आहे. हे आदेशच नाही तर जिनपिंग यांच्या काळात असे अनेक कायदेही करण्यात आले होते जे धक्कादायक आहेत. जिनपिंग यांच्या हुकूमशाही राजवटीत कोणते विचित्र कायदे लागू केले आहेत ते जाणून घ्या.

1. कपड्यांवर बंदी घालणारा अजब कायदा आणण्याची तयारी

आयफोनवर बंदी घातल्यानंतर चीनमध्ये कपड्यांबाबत विचित्र कायदा आणण्याची तयारी सुरू आहे. भावना दुखावणाऱ्या कपड्यांवर चीन बंदी घालणार हे नव्या विधेयकावरून स्पष्ट झाले आहे. चीनमध्ये एखाद्याच्या संवेदना दुखावणारे कपडे घातल्यास दंड आणि तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. मात्र, आरोपींना किती शिक्षा होणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की आरोपींना 15 दिवसांची कोठडी सुनावली जाईल.

2. दाढी वाढवली तर तुरुंगात जाल

दाढी वाढवणे किंवा कमी करणे ही व्यक्तीची निवड असते, परंतु जिनपिंग यांच्या चीनमध्ये असं नाहीये. चीनमध्ये दाढी वाढवल्यास तुरुंगवास होऊ शकतो. अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत ज्यांनी दाढी वाढवली त्यांना सुमारे 6 वर्षे तुरुंगात घालवावी लागली होती. यामुळेच इस्लामला मानणाऱ्या लोकांना चीनमध्ये राहणं कठीण झालं आहे. चीनमध्ये मुस्लिमांच्या स्वातंत्र्य आणि अधिकारांवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विशेषत: चीनच्या शिनजियांग प्रांतात या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते कारण तेथे मुस्लिमांची संख्या जास्त आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, चीन सरकारचा हा कायदा इस्लामच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

3. एडल्ट कंटेंटसाठी तीन वर्षांचा तुरुंगवास

चीनच्या लोकांनी काय बघायचं आणि काय नाही, हेही इथले सरकार ठरवते. देशात बंदी असलेला मजकूर कोणीही पाहिला तर सरकार शिक्षा करू शकते. याशिवाय मोबाइलमध्ये कोणत्याही प्रकारचा अॅडल्ट कंटेंट दिसल्यास किंवा आढळल्यास तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.

4. जस्मिनच्या नावावर आणि फुलावर देखील बंदी

चीन सरकार चमेली फुलांविषयी इतके कठोर आहे की स्थानिक भाषेत या फुलाचे नावही इंटरनेटवर दिसणार नाही. या शब्दावरच बंदी घालण्यात आली आहे. बीजिंगसह देशातील अनेक शहरांच्या बाजारपेठांमध्ये हे फूल बेकायदेशीर घोषित करण्यात आले आहे. ट्युनिशिया-जस्मिन क्रांतीनंतर चीन सरकारने हा निर्णय घेतला.

5. व्हिडिओ गेम्सवर बंदी

चिनी कंपन्या इतर देशांमध्ये व्हिडीओ गेम्स लाँच करून भरपूर पैसे कमवत आहेत, परंतु त्यांच्याच देशात त्यावर बंदी घातली आहे. एवढेच नाही तर देशात स्थलांतराबाबत कडक नियम आहेत. कोणतीही व्यक्ती सरकारला माहिती दिल्याशिवाय कोणत्याही क्षेत्रात जास्त काळ राहू शकत नाही. जर एखादी व्यक्ती कायमस्वरूपी रहिवासी नसलेल्या क्षेत्रात असेल तर त्याला तात्पुरती रहिवासी परवानगी घ्यावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

SCROLL FOR NEXT