Lolita Killer Whale esakal
ग्लोबल

Lolita Killer Whale : अबब, २२६८ किलोची Lolita होणार स्वतंत्र, आता समुद्रात करणार शिकार

लोलिता एक ओर्का आहे. म्हणजे किलर व्हेल आहे. याला १९७० मध्ये सिएटलच्या जवळ पकडलं गेलं होतं.

धनश्री भावसार-बगाडे

लोलिता एक ओर्का आहे. म्हणजे किलर व्हेल आहे. याला १९७० मध्ये सिएटलच्या जवळ पकडलं गेलं होतं. स्थानिक लोक याला टोकी म्हणतात. स्थानिक अमेरिकी व्हेलला टोकिटे म्हणतात. पण हा तेव्हापासून आजपर्यंत कैद होता. लोलिता जगातली सगळ्यात जूनी किलर व्हेल आहे. जी मत्सालयात सादरीकरणासाठी ठेवण्यात आली आहे.

Lolita Killer Whale
लोलिताला फ्लोरिडाच्या सी अॅक्वेरियममध्ये ठेवलं गेलं होतं. रोज हजारो लोक तिला बघायला येतात. लोलिता बारीक किंवा अशक्त नाही. तिचं वजन २२६८ किलोग्राम आहे. आता तिच्या स्वातंत्र्याचे दिवस जवळ आले आहेत.
लवकरच लोलिताला मोकळ्या समुद्रात म्हणजेच तिच्या नैसर्गिक निवासस्थानी सोडण्यात येणार आहे. लोलिताचं वय ५७ वर्ष आहे. आता तिचं अॅक्वेरियममधलं सादरिकरण बंद करण्यात आलं आहे. तिला रिटायर करण्यात आलं आहे. पुढच्या दोन वर्षात तिला प्रशांत महासागरात सोडण्यात येईल.
लोलिताला मोकळ्या समुद्रात सोडण्यासाठी अमेरिकी सरकारची परवानगी घेतली जात आहे. मियामी-डेड काउंटी मेयर डेनिएला लेवीन कावाने सांगितलं की, तिला समुद्रात सोडण्या आधी अनेक प्रकारचे कागदपत्र करावे लागणार आहे.
सगळ्यात पहिले अॅक्वॅरियमचा मालकी हक्क डॉल्फिन कंपनीला द्यायला हवा. ही कंपनी एका खासगी संस्थेच्या सोबत मिळून व्हेल माशांचा इलाज करतात. त्यांना वाचवून रेस्क्यू करते.
लोलिता आता ज्या अॅक्वेरियममध्ये आहे त्याचा मालक यानी सीवर्ल्ड एंटरटेनमेंट ने २०१६ मध्ये किलर व्हेल्सवर परफॉर्मंस करणं बंद केलं होतं. एकेकाळी लोलिता अॅक्वेरियमची सर्वात आवडता जीव होता. तिला २०२२ मार्चला शो मधून रिटायर करण्यात आलं.
डॉल्फिन कंपनीचे चीफ एग्जीक्यूटिव एडुआर्डो अल्बोर ने सांगितलं की, लोलिताच्या चांगल्या भविष्यासाठी आम्ही मियामी सी-एक्वेरियम खरेदी करण्याचं ठरवलं. तिला मोकळ्या समद्रात सोडण्याची मोहिम २०१३ पासून वेगात सुरू झाली. त्यावेळी एक ब्लॅकफीश नावाची डॉक्युमेंट्री प्रसिद्ध झाली होती.
या डॉक्युमेंट्रीमध्ये ओर्का किलर व्हेल्स ला कैद ठेवण्यावर विरोध झाला. त्यांचे तोटे सांगण्यात आले होते. प्राण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकारासाठी काम करणाऱ्या संस्थांना लोलिताला स्वतंत्र करण्यासाठी २०१५ पासून कोर्टात केस चालवत होते. पण हरत होते.
किलर व्हेल्स फार सामाजिक जीव असतो. समुद्रात कोणताही जीव यांची शिकार करत नाही. म्हणूनच हे आरामात ८० वर्ष जगू शकतात. समुद्री डॉल्फिन च्या ३५ प्रजातींपैकी हा एक जीव आहे. ही साधारण २० ते २६ फूट लांब असू शकते.
सगळ्यात लांब ओर्का किलर व्हेल ३२ फूटची होती. जिचं वजन १० टन होतं. यांची पिल्लं जन्मतःच १८० किलोची आणि ८ फूट लांब असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: मनसे नेते अमित ठाकरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Nashik Vidhan Sabha Election 2024 : माझे वोट, माझी ताकद! पोलिस आयुक्तांचे मतदानाचे आवाहन

Ajit Pawar : विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका? वाचा काय म्हणाले अजित पवार

Sindhudurg Assembly Election 2024 : मतदानासाठी ओळखपत्र सोबत नेणे बंधनकारक

अर्ध्यावरती डाव मोडला! २९ वर्षांनी एन आर रहमान व सायरा बानू यांचा घटस्फोट, निवेदन जाहीर करत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT