Malaysia Plane Crash:मलेशियातील क्वालालंपूर येथे गुरुवारी एका चार्टर विमानाचा एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. या अपघातात किमान 10 जणांचा मृत्यू झाला. मलेशियाच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या निवेदनाचा हवाला देत विमानात सहा प्रवासी आणि दोन फ्लाइट क्रू मेंबर असल्याचे सांगण्यात आले. हे विमान लँगकावी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघाले होते आणि ते सुलतान अब्दुल अजीज शाह विमानतळाकडे जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने स्थानिक वेळेनुसार दुपारी २.४७ वाजता सुबांग एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरशी पहिला संपर्क साधला. त्याला लँडिंग क्लिअरन्ससाठी दुपारी २.४८ ची वेळ देण्यात आली होती. यानंतर दुपारी २.५१ वाजता टॉवरमधील कर्मचाऱ्यांना काही अंतरावरून म्हणजेच अपघातस्थळावरून धूर निघताना दिसला. विमानातून 'मे डे'चा एकही कॉल आला नाही.
सेलंगोरचे पोलीस प्रमुख हुसेन उमर खान यांनी सांगितले की, विमान कार आणि मोटारसायकलला धडकले. दोन्ही वाहनांमध्ये प्रत्येकी एक जण होता. फॉरेन्सिक कर्मचारी अवशेष गोळा करत आहेत. त्यांना पोस्टमॉर्टम तपासणी आणि ओळख प्रक्रियेसाठी क्लांग येथील तेंगकू अँपुआन रहीमा हॉस्पिटलमध्ये आणले जाईल. या घटनेची वाहतूक मंत्रालय चौकशी करेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.