Mohamed Muizzu 
ग्लोबल

Maldives Election: मालदीवमध्ये अध्यक्ष मुइझ्झू यांची लाट! निवडणुकीमध्ये चीनप्रेमी पक्षाचा दणदणीत विजय

Muizzu party PNC won election: देशात रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांचा पक्ष पीपल्स नॅशनल काँग्रेस (PNC) पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे.

कार्तिक पुजारी

Maldives- चीनप्रेमी आणि भारतद्वेषी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांना मोठं यश मिळालं आहे. देशात रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांचा पक्ष पीपल्स नॅशनल काँग्रेस (PNC) पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे. यामुळे मुइझ्झू यांच्या हाती मालदीवच्या संसदेचे नियंत्रण आले आहे. भारतासाठी ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.(Maldives President Mohamed Muizzu party PNC won election landslide results india relationship)

मुइझ्झू यांच्या पक्षाने ९३ सदस्यांच्या संसदेमध्ये एक तृतियांश जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पीएनसी पक्षाला मोठा विजय मिळालाय हे स्पष्ट आहे. निकाल जाहीर करण्यात आलेल्या ८६ जागांपैकी पीएनसीला ६६ जागांवर विजय मिळवता आलाय. त्यामुळे त्यांच्या पक्षाने सहज बहुमत प्राप्त केलंय. मे महिन्याच्या सुरुवातील मालदीवमध्ये नवीव संसद सदस्य पाहायला मिळतील..

मालदीव संसदेवर मुइझ्झू यांची पकड

मुइझ्झू यांनी चीनसोबत आर्थिक संबंध सुधारले आहेत. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी भारताऐवजी चीन भेटीला प्राधान्य दिलं होतं. शिवाय मुइझ्झू यांची धोरणे चीनधार्जिणे राहिले आहेत. त्यामुळे पक्षाचा मोठा विजय होणे मुइझ्झू यांचासाठी निर्णायक विजय आहे. यामुळे त्यांना त्यांची धोरणे पुढे रेटता येणार आहेत. मात्र, भारताच्या दृष्टीने ही डोकेदुखी वाढवणारी गोष्ट आहे.

मुइझू यांच्या पीएनसीला मालदीवन डेमोक्रेटिक पार्टीचे Maldivian Democratic Party (MDP) आव्हान होते. मागील निवडणुकीत मोठा विजय मिळवणाऱ्या या पक्षाला यावेळी मात्र मानहाणीकारक पराभव स्वीकाराला लागला आहे. एमडीपी हा पक्ष काहीसा भारताच्या बाजूने बोलणार आहे. पण, जनतेने त्यांना नाकारलंय असं चित्र आहे.

मालदीव हिंद महासागरातील छोटा देश

मालदीव हा समूद्रातील जवळपास ११९२ बेटांचा छोटा देश आहे. ८०० किलोमीटरच्या परिसरात हा देश पसरला आहे. ग्लोबल वॉर्मिगमुळे निर्माण होणाऱ्या वातावरण बदलासाठी सर्वाधिक संवेदनशील देश म्हणून मालदीवची ओळख आहे. हिंद महासागरातील या देशाचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहे. अनेक व्यापारी जाहजे याठिकाणी थांबत असतात. पर्यटनासाठी हा देश प्रसिद्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT