Maldives President Mohamed Muizzu PNC loses election  
ग्लोबल

मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! राजधानीतील महत्वाच्या निवडणुकीत हरला पक्ष, भारत समर्थक उमेदवार विजयी

भारत आणि मालदीव यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. यादरमयान मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझु यांना मोठा धक्का बसला आहे.

रोहित कणसे

भारत आणि मालदीव यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. यादरमयान मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझु यांना मोठा धक्का बसला आहे. मालदीवमधील भारत समर्थक विरोधीपक्ष मालदीवियन डेमोक्रॅटीक पार्टी (MDP) ने राजधानी मालेची मेयर पदाच्या निवडणूकीत मोठा विजय मिळवला आहे.

एमडीपी उमेदवार अॅडम अजीम यांची मालेचे नवीन मेयर म्हणून निवड करण्यात आली आहे.हे पद अतापर्यंत मुइझु यांच्याकडे होतं. मात्र मुइझु यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकल्याने त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. (maldives president muizzu party lost mayor election )

४१ बॉक्सची मोजणी पूर्ण झाल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते अॅडम अजीम यांनी ५३०३ मतांची विजयी आघाडी घेतली, तर मुइझु याच्या पिपल्स नॅशनल काँग्रेस (PNC) चे नेते एशथ अजीमा शकूर यांना फक्त ३,३०१ मतं मिळाली आहेत. एमडीपीचे नेतृत्व भारत समर्थक माजी राष्ट्रपती मोहम्मद सोलिह करत आहेत, जे राष्ट्रपती निवडणूकीत चीन समर्थक नेता मुइझु यांच्याविरोधात परभूत झाले होते. मेयर पदाची निवडणूक जिंकल्यानंतर एमडीपीला पुन्हा एकदा नवसंजीवणी मिळाली आहे.

मुइझु चीनच्या पाच दिवसांच्या दौऱ्यानंतर शनिवारी माले येथे परतले आहते. त्यानी मालदीवमध्ये परतताच आम्ही लहान देश असू पण, यामुळे तुम्हाला आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना मिळत नाही, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी थेट कोणाचं नाव घेतलं नाहीये मात्र हा भारतावरच निशाणा असल्याचे बोलले जात आहे.

वाद कसा सुरू झाला?

मालदीवमधील मेयर पदाची निवडणूक भारतासोबत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर झाले होते. त्यामुळे या निवडणूक निकालांना महत्व प्राप्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी पीएम मोदींनी लक्षद्वीपचा दौरा करता तेथील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पीएम मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्या होत्या . यानंतर भारताकडून नाराजी व्यक्त केली होती. मालदीव सरकारने त्या तीन मंत्र्यांना सस्पेंड केलं होतं.

मालदीवची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटन आणि भारत यांच्यावर अवलंबून आहे. मालदीवमच्या जीडीपीचा मोठा भाग हा पर्यटनातून येतो. रोजगारासाठी देखील बरेच लोक पर्यटनावरच अवलंबून आहेत.

भारतातून मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील मोठी आहे. २०१९ साली १,६६,०३० भारतीय पर्यंटक मालदीवला गेले होते. मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

SCROLL FOR NEXT