भारत आणि मालदीव यांच्यात सध्या संबंध तणावपूर्ण बनले आहेत. दरम्यान भारताकडे दुर्लक्ष करणे मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझु यांना महागात पडू शकतं. मालदीवमध्ये विरोधी पक्षाकडूम भारतासोबतच्या बिघडलेल्या संबंधासाठी सरकारविरोधात आक्रमक झाला आहे. यादरम्यान आता मालदीवमध्ये राष्ट्रपती मुइझु यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो.
मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझु यांना पदावरून हटवण्याची मागणी तेथील संसदीय अल्पसंख्याक नेते अली अजीम यांनी केली आहे. त्यांनी मालदीवच्या नेत्यांना मुइज्जु यांना पदावरून हटवण्यात मदत करण्याची विनंती केली आहे. अली अजीम यांनी सांगितलं की. मालदीवियन डेमोग्रॅटीक पार्टी (एमडीपी) पक्ष हा ही मालदीवच्या परराष्ट्र धोरणात स्थिरता टिकवण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही कोणत्याही शेजारी देशाला आमच्या परराष्ट्र धोरणापासून वेगळे होऊ देणार नाही. राष्ट्रपती मुइझु यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यास ते तयार आहेत का अशी विचारणा आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे केल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे मुइझु यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भारतासोबत सुरू असलेला वाद मालदीवला जड जाणार असं चित्र पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात भारतीय पर्यटक मालदीवमधील बुकिंग कँसल करत आहेत. ट्रॅव्हल कंपन्यांनी केलेल्या विरोधानंतर आता मालदीव टूरिझम असोसिएशनने देखील त्यांच्या मंत्र्यांनी केलेल्या विधानांचा निषेध केला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मंत्र्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर मालदीवच्या माजी उपराष्ट्रपती अहमद अदीब यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मालदीवच्या सरकारला त्यांनी भारतची माफी मागितली पाहिजे असे सुनावले. अदीब म्हणाले की, राष्ट्रपती मुइझु यांनी पीएम मोदी यांच्याकडे जाईन राजकीय संकटातून मार्ग काढला पाहिजे. तसेच ते म्हणाले की भारतीय नेत्यांविरोधात टिप्पणी स्वीकर केली जाऊ शकत नाही.
नेमकं झालं काय?
या सर्व प्रकरणाची सुरूवात ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीपच्या दौऱ्यानंतर झाली होती. पीएम मोदी लक्षद्वीप दौऱ्यावर गेले असताना त्यांनी या भेटीदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यासोबत त्यांनी भारतीयांना आवाहन केले की तुम्ही देखील या बेटांवर पर्यटनासाठी या. यानंतर मालदीव येथील मंत्री मरियम शिउना यांनी पीएम मोदी यांच्याबद्दल पोस्ट करत आक्षेपार्ह टिप्पणी केली. नंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली. मरियम शिउना यांच्यासोबत तीन मंत्र्यांना मालदीव सरकारने निलंबित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.