Esakal
ग्लोबल

विमानात महिलेसमोर चार वेळा केलं आक्षेपार्ह कृत्य; सहप्रवाशाची गुप्तचर संस्थेकडून चौकशी

संबंधित विमान कंपनीनं देखील आरोपी प्रवाशावर केली कारवाई

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : विमान प्रवासात महिलेसमोर एका पुरुष सहप्रावाशानं चार वेळा हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेत घडला आहे. या प्रकारानंतर संबंधित प्रवाशावर अटकेची करवाई करण्यात आली. सिटल ते फिनिक्स या शहरांदरम्यान साऊथवेस्टच्या विमानात हा प्रकार घडला. (Man masturbates four times in front of woman passenger on flight arrested)

अँटोनिओ शेरॉड मॅगॅरिटी असं या पुरुष प्रवाशाचं नाव असून विमानानं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्यांनं संबंधित महिलेसमोर हे आक्षेपार्ह कृत्य करण्यास सुरुवात केली. यानंतर जेव्हा विमान फिनिक्स शहरातील स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड झालं त्यावेळी स्थानिक पोलिसांनी त्याला अटक केली. २ एप्रिल रोजी ही घटना घडली होती.

दरम्यान, आपल्या आरोपावर भाष्य करताना मॅगॅरिटीनं पोलिसांना सांगितलं की, "आपण काहीही चुकीचं केलेलं नाही" पण ही व्यक्ती एक विकृत व्यक्ती असल्याचं याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीत म्हटलं आहे, डेली बिस्टने याबाबत वृत्त दिलं आहे. या व्यक्तीच्या आक्षेपार्ह कृत्यानंतर संबंधित महिलेनं विमानाच्या क्रू मेंबर्सना याची माहिती दिली. त्यानंतर संबंधित महिलेची जागा तात्काळ बदलून देण्यात आली.

फिनिक्समध्ये विमान उतरल्यानंतर पोलिसांनी या महिलेशी चर्चा केली. त्यानंतर तिनं हा धक्कादायक प्रकार पोलिसांना कथन केला. यामध्ये संबंधित पुरुष सहप्रवाशानं चार वेळा हस्तमैथूनाचा किळसवाणा प्रकार केल्याचं सांगितलं. याप्रकारामुळं आरोपी मॅगॅरिटी याला साऊथवेस्ट विमान कंपनीनं ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं असून त्याच्यावर प्रवासासाठी कायमची बंदी घातली आहे. तसेच त्याची अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडून (एफबीआय) चौकशी करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT