Bryan Johnson : वाढतं वय कुणालाच आवडत नाही. कारण कुणालाच तारूण्यातून म्हातारपणात जायचं नाहीये. मात्र, निसर्गाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक व्यक्ती ही म्हातारी होणारचं आहे. आज अनेकजण वाढतं वय लक्षात येऊ नये यासाठी विविध प्रयोग करत असतात. मात्र, आज आम्ही अशा एका दाव्याबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये एका व्यक्तीने लाखो रुपये खर्च करून स्वतःचे वय एक दोन नव्हे तर, पाच वर्षांनी कमी करून घेतल्याचा दावा केला आहे.
हेही वाचा: काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??
ब्रायन जॉन्सन असे वय कमी केलेल्या व्यक्तीचे नाव असून, 'प्रोजेक्ट ब्लूप्रिंट'च्या माध्यमातून ब्रायन यांनी त्यांचे जैविक वय सुमारे 5 वर्षांनी कमी केल्याचा दावा केला आहे. ब्रायन यांनी स्वतःचे वय कमी करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. एवढेच नव्हे तर, यासाठी ब्रायन यांनी या2013 मध्ये स्वतःची कंपनी PayPal 6500 कोटींना विकली होती.
KernelCo आणि BrainTree नावाच्या कंपन्यांचे संस्थापक ब्रायन जॉन्सन वय कमी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याबरोबरच तब्येतीच्या प्रत्येक बिंदूकडे लक्ष देत असल्याचे सांगतात. असे करण्यामागे केवळ आणि केवळ वय कमी करण्याचा उद्देश असल्याचे ब्रायन यांचे म्हणणं आहे. याबाबत ते 'प्रोजेक्ट ब्लूप्रिंट'बद्दल ट्विटरवरून वारंवार अपडेट्स देत असतात.
ब्रायन यांनी प्रोजेक्ट ब्लूप्रिंट अंतर्गत एक वेलनेस प्रोटोकॉल तयार केला आहे. यात शरीराच्या सर्व ७८ अवयवांसाठी बायोमार्कर तयार करण्यात आले आहे. या बायोमार्कर्सच्या मदतीने शरीरातील होणाऱ्या बदलांची नोंद केली जाते. झोपेवर लक्ष ठेवण्यासाठी जॉन्सन WHOOP चे उपकरणाचा वापर करतात.
ब्रायन यांचे सध्याचे वय ४४ वर्षे असून, प्रोजेक्ट ब्लूप्रिंटमुळे ५.१ वर्षांनी कमी झाल्याचा दावा ब्रायन यांनी केला आहे. साधारण १० वर्षांपूर्वी ब्रायन नैराश्येत गेल्याचे सांगतात. यावेळी त्यांनी स्वतःशीच मैत्री केली. तेव्हापासून आपण आनंदी, सर्जनशील आणि परिपूर्ण झाल्याचे वाटत असल्याचे ब्रायन सांगतात.
ब्रायन जॉन्सन त्यांच्या @bryan_johnson ट्विटर अकाउंटवर आहार आणि व्यायामाशी संबंधित माहिती वेळोवेळी शेअर करत असतात. ट्विटरवर त्यांचे जवळपास 52 हजार फॉलोअर्स आहेत. गेल्या वर्षी एका यूट्यूब व्हिडिओमध्ये ब्रायन यांनी ब्लूप्रिंट प्रोजेक्ट अंतर्गत संपूर्ण दिवसाचा दिनक्रम शेअर केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.