joe biden. esakal
ग्लोबल

जो बायडन यांना जीवे मारण्याची दिली धमकी; FBI ने आरोपीला ठारच मारलं

जो बायडन पश्चिम अमिरेकेचा दौरा करत आहेत. ते बुधवारी न्यू मॅक्सिको येथे गेले होते, त्यानंतर त्यांचे यूटा येथे येण्याचे नियोजन होते.

सकाळ डिजिटल टीम

Man Who Threatened Joe Biden Killed

वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला एफबीआयने यमसदनी पाठवलं आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की, यूटा येथे राहणाऱ्या आरोपीला अध्यक्ष बायडेन हे राज्यात जाण्यापूर्वीच त्याला ठार करण्यात आलंय. जो बायडन पश्चिम अमिरेकेचा दौरा करत आहेत. ते बुधवारी न्यू मॅक्सिको येथे गेले होते, त्यानंतर त्यांचे यूटा येथे येण्याचे नियोजन होते. एनडीटीव्हीने यासंदर्भातील बातमी दिलीये.

फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन संस्थेकडून सांगण्यात आलं की, स्पेशल एजेंट वॉरंट घेऊन सॉल्ट लेक सिटीच्या दक्षिणेमध्ये असलेल्या प्रोवोमध्ये क्रेग डिवीयू रॉबर्टसन याच्या घरी पोहोचले होते. यादरम्यान, सकाळी सहा वाजून १५ मिनिटांनी गोळीबार झाला. सूत्रांच्या माहितीनुसार क्रेह डिवीयू रॉबर्टसन याच्याकडे शस्त्रास्त्रे होती. गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

रॉबर्टसनने सोमवारी एक पोस्ट करुन म्हटलं होतं की, बायटन यूटा येथे येत असल्याचं ऐकलं आहे. मी इकडे एम२४ स्नायपर रायफलवरील धुळ साफ करत आहे. त्यांनी इथे यावेच. रॉबर्चसन याच्या पोस्टमुळे एफबीआय सतर्क झाली. त्यांनी रॉबर्टसन याच्या घरी छापा टाकण्याचे ठरवले. त्यानंतर सकाळच्या सुमारास रॉबर्टसन ठार झाल्याचं जाहीर करण्यात आलं. एफबीआयने यासंदर्भात अधिक माहिती देण्याचं टाळलं आहे.

रॉबर्टसनने आपल्या एका पोस्टमध्ये स्वत:ला 'एमएजीए ट्रम्पर' म्हटलं आहे. हे नाव माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' घोषणेच्या संदर्भात आहे.रॉबर्टसनने याआधीही अनेकवेळा वादग्रस्त पोस्ट केल्या आहेत. २०२२ मध्ये केलेल्या एका पोस्टमध्ये त्याने लिहिलं होतं की एका अध्यक्षाची हत्या करण्याची ही योग्य वेळ आहे. अगोदर जो बायडन आणि त्यानंतर कमला. रॉबर्टसन डोनाल्ड ट्रम्प यांचा चहाता असल्याचं सांगितलं जात. ट्रम्प यांच्याविरोधात कोर्टात लढणाऱ्या वकीलाला त्याने जीव मारण्याची धमकी दिली होती.त्यामुळे एफबीआय त्याच्यावर लक्ष ठेवून होती. अखेर त्याला ठार मारण्यात यश आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT