Mass Stabbing  
ग्लोबल

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Mass Stabbing In London: लंडनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका हल्लेखोराने हातात तलवार घेऊन रस्त्यावर दहशत माजवली आहे.

कार्तिक पुजारी

लंडन- लंडनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका हल्लेखोराने हातात तलवार घेऊन रस्त्यावर दहशत माजवली आहे. अनेकांना त्याने भोसकले असल्याचं कळतंय. हेअरनॉट स्टेशनजवळ सकाळी हा प्रकार घडला. दोन पोलिसांसह काही नागरिक गंभीर जखमी असल्याचं कळतंय. रिपोर्टनुसार, आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. (Mass Stabbing In London)

सदर घटनेचा भीतीदायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक व्यक्ती हातात तलवार घेऊन फिरत आहे. पोलीस आणि एमरजेन्सी वाहन घटनास्थळी पोहोचलेले होते. योगायोग म्हणजे आजच्या दिवशी पंचविस वर्षांपूर्वी लंडनच्या वेस्ट एंडमध्ये गे बारमध्ये बॉम्बस्फोट झाला होता.

धक्कादायक घटनेमध्ये तलवार बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने अनेकांना भोसकल्याची माहिती आहे. आरोपीने रस्त्यावरील काही लोकांवर हल्ला केला. तसेच दोन पोलिसांना जखमी केलं आहे. जखमी लोकांबाबत आम्ही अपडेट घेत आहोत. ३६ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आले असून त्याला कस्टडीमध्ये ठेवण्यात आले आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

डेप्युटी पोलीस कमिशनर अडे अडेलेकन हे म्हणाले की, सदर घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं आणि आरोपीने कोणत्या कारणासाठी असं कृत्य केलं हे सर्वांना जाणून घ्यायचं आहे. पण, तुर्तास यासंदर्भात आम्ही माहिती गोळा करत आहोत. लवकरात लवकर यासंदर्भातील माहिती नागरिकांना देण्यात येईल. मात्र, सदर घटनेमध्ये दहशतवादाची शक्यता नाही. शिवाय यामध्ये इतर व्यक्तींचा देखील समावेश नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT