ग्लोबल

टॅक्सी चालवणाऱ्या भारतीय महिलेचा असामान्य प्रवास; विदेशात झाली पोलीस

शर्वरी जोशी

आई, बहीण, पत्नी अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडणारी स्त्री आज कोणत्याच क्षेत्रात मागे नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी एक स्त्री घराबरोबरच तिचं करिअरदेखील तितक्याच नेटाने सांभाळते. त्यामुळे स्त्रीच्या परिश्रमांचं आणि तिच्या जिद्दीचं करावं तितकं कौतुक कमी आहे. विशेष म्हणजे आजच्या  जगात अशाही काही स्त्रिया पाहायला मिळतात. ज्या असामान्य परिस्थितीवर मात करुन स्वत: ला सिद्ध करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका सामान्य स्त्रीच्या असामान्य कर्तृत्वाची चर्चा रंगली आहे. भारतात एक टॅक्सी चालवणारी महिला आज थेट विदेशातील पोलीस खात्यात उच्च पदावर काम करत आहे.  विशेष म्हणजे तिच्या जिद्दीकडे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

प्रत्नांती परमेश्वर असं कायमच म्हटलं जातं आणि असाच काहीसा प्रकार पंजाबमधील एका महिलेसोबत घडला आहे. साधी टॅक्सी चालवणारी मनदीप कौर आज न्युझीलंडमध्ये पोलीस खात्यात उच्च पदावर कार्यरत आहे. विशेष म्हणजे न्युझिलंड पोलीस खात्यात भरती होणारी ही पहिला भारतीय महिला ठरली आहे. मात्र, त्यांचा हा प्रवास दिसतो तितका सोपा आणि सरळ नव्हता.
पंजाबमधील कमालू या गावातील मनदीप कौर या लग्नानंतर चंदीगढ येथे वास्तव्यास आल्या. त्यानंतर हळूहळू संसाराचा गाडा चालवत असताना त्या १९९६ मध्ये ऑस्ट्रेलिया येथे गेल्या. ऑस्ट्रेलियामध्ये काम करत असताना दुसरीकडे त्यांचं शिक्षण सुरु होतं. याच काळात त्या  ऑस्ट्रेलिया सोडून न्यूझिलंडमध्ये रहायला गेल्या. या काळात त्यांनी पेट्रोल पंप, सेल्समन अशी अनेक लहान-मोठी कामं केली. मात्र, इंग्लिश व्यवस्थित येत नसल्यामुळे अनेक ग्राहकांनी त्यांच्याकडे तक्रादेखील केली होती.

इथून सुरु झाला टॅक्सी चालवण्याचा प्रवास

१९९९ मध्ये न्युझिलंडला गेलेल्या मनदीप यांनी लहानमोठी काम केल्यानंतर टॅक्ली चालवण्यास सुरुवात केलाी. त्यावेळी त्या लॉकलॅडमधील YMCA women या हॉटेलमध्ये राहत होत्या. याच हॉटेलमध्ये त्यांची भेट सेवानिवृत्त पोलीस अधिकारी John Pegler यांच्यासोबत झाली.

मनदीप जॉन पेग्लर यांना वडील मानायची. त्यामुळे अनेकदा या दोघांमध्ये गप्पा रंगायच्या आणि पेग्लर, मनदीपला त्यांच्या पोलीस खात्यातील काही रंजक कथा सांगायचे. पेग्लर यांच्या कथा ऐकून मनदीप एककीकडे प्रेरित होत होती, त्यामुळे तिने एक दिवस पोलीस होण्याची इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे पेग्लर यांनी मनदीपला पोलीस होण्यासाठी मदत केली.

सोपा नव्हता हा प्रवास

न्युझिलंड पोलीस खात्यात भरती होण्यापूर्वी मनदीपला प्रचंड मेहनत करावी लागली. त्यांना तब्बल २० किलो वजन कमी करावं लागलं. कुटुंब आणि स्वप्न या दोन्ही गोष्टी सांभाळत असताना त्यांची तारेवरची कसरत व्हायची.मात्र, त्यांनी जिद्द सोडली नाही. अथक प्रयत्न केल्यानंतर मनदीप न्युझिलंडच्या पोलीस खात्यात वरिष्ठ कॉन्स्टेबल म्हणून रुजु झाल्या. त्यानंतर अनेदा त्यांनी प्रमोशनसाठीदेखील अर्ज केला. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. अखेर, काही काळाने त्यांचा अर्ज स्वीकारला आणि त्या सीनिअर सार्जंट या पदापर्यंत पोहोचल्या. विशेष म्हणजे या पदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या पहिला भारतीय महिला आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT