घरी परतत असताना खोदाई यांच्यावर गोळीबार झाला होता.
दुबई : रिव्होल्युशनरी गार्ड्सचे कर्नल सय्यद खोदाई (Sayad Khodai) यांच्या मृत्यूचा बदला इराण घेणार आहे. अध्यक्ष इब्राहिम रायसी (Ebrahim Raisi) यांनी सोमवारी ही माहिती दिलीय. तेहरानमध्ये रविवारी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी एका अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केलीय, त्यामुळं इराणमधील वातावरण चांगलंच तापलंय.
इराणचे (Iran) राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी सांगितलं की, मी अधिकाऱ्यांना या प्रकरणावर लक्ष ठेवण्यास सांगितलंय. आम्ही आमच्या शहीद कर्नलच्या रक्ताचा बदला घेऊ. इब्राहिम रायसी यांनी ओमान दौऱ्यावर जाण्यापूर्वी या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. ओमानमध्ये ते सुलतान हैथम बिन तारिक यांची भेट घेणार आहेत.
मेहर वृत्तसंस्थेनुसार गार्डचे प्रवक्ते रमजान शरीफ म्हणाले, गार्डच्या हत्येमुळं इराणच्या शत्रूंचा सामना करण्याचा त्यांचा निर्धार दिसून आला. कर्नल खोदाई यांच्या हौतात्म्यानं सुरक्षा, स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी आणि इराणी राष्ट्राच्या शत्रूंचा सामना करण्यासाठी रिव्होल्यूशनरी गार्ड्सचा निर्धार मजबूत होतो, असं त्यांनी नमूद केलंय. दरम्यान, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं खोदाई यांचं वर्णन 'अभयारण्य रक्षक' म्हणून केलंय. सीरिया किंवा इराकमध्ये इस्लामिक रिपब्लिकच्या वतीनं काम करणाऱ्यांसाठी हा शब्द वापरला जातो. दोन्ही देशांमध्ये इराणचा मोठा राजकीय प्रभाव आहे. सीरियाच्या गृहयुद्धात त्यांनी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना पाठिंबा दिला होता.
अधिकृत वृत्तसंस्था IRNA ने सांगितलं की, रविवारी सायंकाळी 4:00 वाजता घरी परतत असताना खोदाई यांच्यावर गोळीबार झाला. यामध्ये त्यांना पाच गोळ्या लागल्या. एजन्सीनं याचे फोटोही प्रकाशित केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.