निकोशिया (सायप्रस) - रशियाने युक्रेनवर सुरु केलेल्या युद्धामुळे मध्यपूर्वेत अन्नधान्याचा (Grains) तुटवडा निर्माण झाला आहे. गव्हाचा जागतिक पातळीवर निर्यात रशिया व युक्रेनचा एकत्रित वाटा ३० टक्के आहे. रशिया जगातील गव्हाचा सर्वात मोठा निर्यातदार असून युक्रेन चौथ्या स्थानी आहे. दुसरीकडे दोन्ही देश मिळून १९ टक्के मक्याची निर्यात करतात. युक्रेनमधील (Ukraine) युद्ध हे असेच सुरु राहिले तर यामुळे युक्रेनियन गव्हाची लागवड करु शकणार नाहीत. दुसरीकडे रशियावरील निर्बंधांमुळे रशियाला आपले उत्पादन विकता येणार नाही. याचा परिणाम अन्नधान्यांच्या किंमती वाढण्यावर होईल. यामुळे ब्रेड, दुध, मटण आणि इतर उत्पादनांचे दर वाढतील. जागतिक अन्न संस्थेच्या २०२० च्या माहितीनुसार लेबनाॅन ८१ टक्के गव्हू युक्रेनकडून तर १५ टक्के रशियाकडून विकत घेतले गेले होते. (middle east suffer grains shortage due to war in ukraine)
इजिप्त हा ६० टक्के गव्हू रशिया तर २५ टक्के युक्रेनकडून विकत घेतले. तुर्कस्तानने ६६ टक्के गव्हू रशिया आणि १० टक्के युक्रेनकडून खरेदी केला होता. अनेक मध्यपूर्वेतील (Middle East) सरकारांना आणि विशेषतः इजिप्त, लिबिया आणि तुर्कस्तान यांना वाढते अन्नधान्याचे किंमत मोजणे शक्य नाही. यामुळे ब्रेडवरील अनुदान कमी किंवा बंद केले जाऊ शकते. रशियाचे युक्रेनवरील हल्ल्यानंतर इजिप्त गव्हाला पर्याय शोधत आहे. मागील वर्षी या देशाने ८५ टक्के गव्हू रशिया व युक्रेनकडून आयात केले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.