ग्लोबल

जगातल्या श्रीमंत व्यक्तीने अवघ्या काही दिवसात गमावले अब्जावधी रुपये

अवघ्या काही दिवसात गमावली संपत्ती

सकाळ डिजिटल टीम

ऑनलाइन एज्युकेशन कंपनी जीएसएक्स टेकएडूच्या ( GSX Techedu) सीईओ लॅरी चेन यांनी ७ वर्षांपूर्वी त्यांची पहिली कंपनी सुरु केली होती. GSX Techedu या कंपनीचा २०१९ मध्ये न्युयॉर्क एक्सचेंज स्टॉक एक्सचेंज (NYSE) मध्ये समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे तेव्हापासून ही कंपनी सर्वात मोठी चायनीज एज्युकेशन कंपनी म्हणून उदयाला आली. परंतु, लॅरी चेन यांनी केवळ महिन्याभरामध्ये बिलिअन डॉलर्सचं नुकसान सहन करावं लागलं आहे. या कंपनीने पाच महिन्यात १४ बिलिअन डॉलर्स गमावले आहेत. (middle-school-teacher-turned-tycoon-loses-14-billion-in-just-months)

कोण आहेत GSX चे सीईओ लॅरी चेन

चीनमधील एका लहानशा गावात शालेय शिक्षक म्हणून लॅरी चेन (larry chen) काम करत होते. याच काळात लॅरी चेन यांनी एक ऑनलाइन एज्युकेशन कंपनी gsx techedu सुरु करण्याचा निर्धार केला आणि कंपनीची स्थापना केली. विशेष म्हणजे कमी कालावधीत या कंपनीने यशाचं शिखर गाठलं आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये लॅरी चेन यांच्या नावाचा समावेश झाला. परंतु, गेल्या काही काळापासून ऑनलाइन एज्युकेशन बिझनेसमध्ये होत असलेल्या चढउतारांमुळे लॅरी चेन यांच्या कंपनीचे शेअर घसरल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे कंपनीचे शेअर घसरल्यामुळे लॅरी चेन यांचं श्रीमंत व्यक्तींच्या यादीतलं नाव आता खालती आलं आहे.

NYSE मध्ये लॅरी चेन यांच्या कंपनीचे शेअर्स ४ टक्क्यांनी घसरले. तर, ब्रोकरेज फर्ममधील Goldman Sachs Group Inc. या कंपनीने gsx techedu वर डाउनग्रेड केलं असून कंपनीचे प्राइज टार्गेटदेखील कमी केलं आहे.

हे आहे चिंतेचं मूळ कारण

सध्या ऑनलाइन एज्युकेशन क्षेत्रातील या दिग्गज कंपनीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. चीनमधील ऑनलाइन एज्युकेशन सेक्टरमध्ये सध्या मंदीचा काळ सुरु आहे. त्यामुळेच GSX Techedu Inc कंपनीला आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. तर, दुसरीकडे मात्र, कंपनीने चांगला रिझल्ट द्यावा यासाठी गुंतवणूकदारांकडून कंपनीवर दबाव टाकला जात आहे.

चीन सरकारच्या नव्या पॉलिसीचा फटका सध्या GSX Techedu Inc या कंपनीला बसला आहे असं हॉगकॉगमधील गुंतवणूकदारांना शेअर खरेदीविषयी सल्ला देणाऱ्या टॉमी वोंग यांनी म्हटलं.

मुलांवर टाकला जातोय शिक्षणासाठी दबाव

गेल्या काही महिन्यांपासून लहानम मुलांवर ऑनलाइन शिक्षणाचा दबाव टाकला जात असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे चीनच्या सरकारने अशा ऑनलाइन एज्युकेशन कंपन्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

GSX ला ठोठावण्यात आला दंड

३ ते ८ वयोगटातील मुलांसाठी असलेल्या प्री स्कूल एज्युकेशन बिझनेस बंद करण्याचा निर्णय GSX या कंपनीने घेतला आहे. चीन सरकारने प्राथमिक शिक्षण देणाऱ्या किंडरगार्डन आणि प्रायव्हेट ट्युटोरिइल स्कूलसाठी असलेले नियम कठोर केले आहेत. त्यातच एप्रिल महिन्यात GSX सह अन्य चार प्रायव्हेट एज्युकेशन प्रोव्हाइडर कंपन्यांवर ५ लाख युवानपेक्षा जास्त दंड ठोठावण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT