Migrated Sakal
ग्लोबल

लॉकडाउनमध्येही लाखो जणांचे स्थलांतर; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

‘यूएनएचसीआर’ने स्थलांतराबाबतचा अहवाल आज प्रसिद्ध केला आहे. यानुसार, जगभरातील निर्वासितांची एकूण संख्या आता 8 कोटी 24 लाख इतकी झाली आहे.

पीटीआय

जीनिव्हा - जगभरात विविध ठिकाणी सुरु असलेली युद्धे, हिंसाचार, अत्याचार आणि मानवाधिकारांचे उल्लंघन या कारणांमुळे गेल्या वर्षभरात जगभरात एकूण ३० लाख लोकांना निर्वासित (Migrated) व्हावे लागल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या (United Nation) निर्वासित उच्चायुक्तालयाने (यूएनएचसीआर) (UNHCR) सांगितले आहे. कोरोना संसर्गस्थितीमुळे सर्वच देशांच्या सीमा बंद झाल्या असताना आणि प्रवासावर निर्बंध असतानाही इतक्या प्रचंड संख्येने लोकांनी स्थलांतर केल्याने परिस्थितीचे गांभीर्य दिसून येत असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. (Millions Migrated to Lockdown United Nations Report)

‘यूएनएचसीआर’ने स्थलांतराबाबतचा अहवाल आज प्रसिद्ध केला आहे. यानुसार, जगभरातील निर्वासितांची एकूण संख्या आता 8 कोटी 24 लाख इतकी झाली आहे. जर्मनीची लोकसंख्याही जवळपास इतकीच आहे. बळजबरीने स्थलांतर करावे लागलेल्या लोकांमध्ये सलग नवव्या वर्षी मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या स्थलांतरामागे हिंसाचार आणि देशांतर्गत संघर्ष या कारणांबरोबरच पर्यावरण बदलाच्या परिणामांमुळेही मोझांबिक, इथिओपिया आणि आफ्रिका खंडातील काही भागातील लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. अशा लोकांची संख्या काही हजारांमध्ये आहे तर सीरिया आणि अफगाणिस्तानातील युद्धजन्यस्थितीमुळे निर्वासित झालेल्यांची संख्या लाखांमध्ये आहे.

जगभरातील ९९ देशांनी कोरोनास्थितीमुळे आपल्या सीमा इतरांसाठी बंद केल्या होत्या. मानवतेच्या दृष्टीकोनातूनही त्यांनी निर्वासितांना स्थान दिले नाही. त्यामुळे सीमा खुल्या होतील तेव्हा अडकून पडलेले निर्वासित मोठ्या संख्येने अशा देशांमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता ‘यूएनएचसीआर’चे उच्चायुक्त फिलीपो ग्रँडी यांनी व्यक्त केली. मोठ्या देशांनी त्यांचा युद्धज्वर शमविला नाही तर निर्वासितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

अहवालानुसार, गेल्या वर्षी जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्का लोक निर्वासित झाले असून दहा वर्षांपूर्वी निर्वासित झालेल्यांच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. निर्वासितांपैकी ४२ टक्के जण १८ वर्षांच्या खालील आहेत. २०१८ ते २०२० या कालावधीत सुमारे १० लाख बालके निर्वासित म्हणूनच जन्माला आली.

निर्वासितांचे प्रमाण (२०२०) देशांबाहेर गेलेले

  • ५७ लाख - पॅलेस्टाइनमधून

  • ३९ लाख - व्हेनेझुएलामधून

  • २ कोटी ७ लाख - इतर देशांमधून

  • ४ कोटी ८० लाख - अंतर्गत विस्थापित

  • ४१ लाख - आश्रय मागितलेले

गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे आपण सर्व जण आपापल्या घरांमध्ये किंवा शहरांमध्ये अडकून पडलो असताना जवळपास तीस लाख लोकांना त्यांचे सर्व काही मागे सोडून बाहेर पडावे लागले होते, कारण त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच उरला नव्हता.

- फिलीपो ग्रँडी, उच्चायुक्त, यूएनएचसीआर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT