Russia Ukraine War Update : रशिया-युक्रेन युद्धाला वर्ष होत आलं तरीही दोन्ही देश समोरासमोर लढत आहेत. रशियाच्या विरोधात युक्रेनला पश्चिमी देश मदत करत आहेत. त्यामुळे युक्रेनची सैन्य क्षमता वाढली आहे.
मागील काही दिवसांपासून युक्रेनने रशियाला जोरदार प्रत्त्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. युक्रेनला अमेरिकेने ९० कॉम्बॅट वाहनं आणि पॅट्रिएट मिसाईल देण्याचं जाहीर केलं आहे. इतर देशांच्या मदतीमुळेच आता रशियाची चिंता वाढली आहे.
युक्रेन रशियाच्या राजधानीवर हल्ला करु शकतो, या भीतीपोटी रशियाने राजधानी मॉस्कोमधल्या उंच-उंच इमारतींवर मिसाईल लाँचर आणि एँटी मिसाईल डिफेंस सिस्टीम तैनात केली आहे. तसेच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानाजवळ एँटी एअर मिसाईल सिस्टीम तैनात केली आहे.
'द डेली मेल'च्या माहितीनुसार रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय संरक्षण केंद्राच्या छतावर एक पँटिर-एस १ सुरक्षा प्रणाली दिसून येत आहे. विशेष म्हणजे एका व्हीडिओमध्ये त्याच शक्तिशाली प्रणालीला क्रेमलिनपासून दीड किलोमीटर लांब तगांका जिल्ह्यातल्या टेटरिंस्कीमध्ये छतावर नेताना दिसून आलेलं आहे.
एकूणच पश्चिमी देशांकडून युक्रेनला मिळत असलेल्या मदतीमुळे रशियामध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. इमारतींवरही मिसाईल लाँचर तैनात केल्याने जगभरात या गोष्टीची चर्चा होतेय. युक्रेन खरंच रशियाची राजधानी मॉस्कोवर हल्ला करणार का? हे पुढच्या काळात कळेलच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.