Missing Bangladeshi MP Anwarul Azim killed in Kolkata Bangladesh police arrest three  Esakal
ग्लोबल

Bangladeshi MP: बांगलादेशचे बेपत्ता खासदार कोलकातातील एका फ्लॅटमध्ये आढळले मृतावस्थेत, समोर आले कारण

Bangladeshi MP: बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की, कोलकाता पोलिसांनी अनवारुल अजीम यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वेळा खासदार राहिलेले अनवारुल अजीम कोलकाता येथील एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आले आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

बांगलादेशातील सत्ताधारी पक्ष अवामी लीगचे बेपत्ता खासदार अनवारुल अजीम अनार यांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. ते उपचारासाठी भारतात आले होते आणि गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता होते. यापूर्वी त्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.

18 मे रोजी कथितपणे बेपत्ता झालेले बांगलादेशातील सत्ताधारी पक्षाचे खासदार (MP) अनवारुल अजीम आज (बुधवारी) कोलकाता येथे मृतावस्थेत आढळून आले आहेत.

बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी सांगितले की, कोलकाता पोलिसांनी अनवारुल अजीम यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वेळा खासदार राहिलेले अनवारुल अजीम हे एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आले, तिथे ते कोणालातरी भेटण्यासाठी गेले होते.

अनवारुल अजीम 12 मे रोजी कोलकाता येथे पोहोचले होते. तेव्हापासून त्याचा कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकला नाही. त्याचा फोनही १४ मेपासून बंद होता.

बांगलादेशी खासदार बेपत्ता झाल्याची माहिती 18 मे रोजी उत्तर कोलकाता येथील बर्नानगर पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनवारुल अजीम 12 मे रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्याचा कौटुंबिक मित्र गोपाल बिस्वास याला त्याच्या कोलकाता येथील घरी भेटण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी दुपारी 1.41 वाजता डॉक्टरांना भेटण्याचे कारण सांगून ते तेथून निघून गेले होते. संध्याकाळी परत येईल असेही त्यांनी सांगितले होते.

अनवारुल अजीम यांनी बिधान पार्कमधील कलकत्ता पब्लिक स्कूलसमोर टॅक्सी पकडली. संध्याकाळी त्यांनी गोपालला एक व्हॉट्सॲप मेसेज पाठवून कळवले की, ते दिल्लीला जात आहेत आणि ते तिथे पोहोचल्यावर त्यांना फोन करतील.

अनवारुल अजीम यांनी 14 मे रोजी बिस्वास यांना दुसरा मेसेज पाठवला, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, ते दिल्लीला पोहोचले आहेत आणि येथे काही व्हीआयपींसोबत आहेत, त्यामुळे त्यांना कॉल करण्याची गरज नाही. त्याने हाच संदेश त्याच्या पीए रौफलाही पाठवला. परंतु 17 मे रोजी त्यांच्या मुलीने गोपाल बिस्वास यांना फोन केला. पंरतु त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकलेला नाही.

या प्रकरणात बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी ढाका येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, कोलकाता येथे खासदाराची हत्या झाली. बुधवारी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मंत्री म्हणाले की, बांगलादेश पोलिसांनी या संदर्भात तीन जणांना अटक केली आहे, अशी माहिती बांगलादेश वृत्तपत्र डेली स्टारने दिली आहे.

बांगलादेशचे गृहमंत्री पुढे म्हणाले, "आतापर्यंत, आम्हाला कळले आहे की सर्व मारेकरी बांगलादेशी आहेत. ही नियोजित हत्या होती". मृतदेहाचा ठावठिकाणा विचारला असता, याबाबत अद्याप माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय पोलिस या प्रकरणात सहकार्य करत आहेत. 12 मे रोजी भारतात गेलेले बांगलादेशचे खासदार अनवारुल अजीम हे 13 मे रोजी दुपारी वैद्यकीय तपासणीसाठी कोलकाताजवळील बिधाननगर येथील घरी मित्रांसोबत गेले असताना त्यांना अखेरचे पाहिले गेले अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT