Muhammad Yunus sakal
ग्लोबल

Muhammad Yunus : युनूस यांच्याकडे हंगामी सरकारची जबाबदारी? विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मुख्य सल्लागारपदासाठी मान्यता

सकाळ वृत्तसेवा

बांगला देशमधील ‘डेली स्टार’ या इंग्रजी वृत्तपत्राने एका विश्वसनीय स्रोतांच्या आधारे हा माहिती दिली आहे. ‘‘विद्यार्थ्यांच्या वतीने माझ्याशी संपर्क साधण्यात आला तेव्हा सुरुवातीला मी नकार दिला होता. ‘‘माझ्या हातातील अनेक कामे मला संपवायची आहेत. पण देशातील संकटकाळात मी सूत्रे हाती घेण्याचा आग्रह विद्यार्थ्यांनी कायम ठेवला,’’ असे युनूस म्हणाले. ‘‘या आंदोलनात अनेकांचे जीव गेले आहेत.

सामान्य नागरिक आणि विद्यार्थीही मारले गेले आहेत. बांगलादेशला योग्य पद्धतीने देश चालवण्याची संधी आता आहे आणि तुम्ही जबाबदारी घेतली तरच हे शक्य आहे. तुम्ही जबाबदारी घेण्यास सहमत नसाल तर आपल्यापैकी कोणासाठीही हे चांगले नाही.

म्हणूनच आम्ही तुम्हाला सूत्रे हाती घेण्यास सांगत आहोत,’’ अशी विनंती एका विद्यार्थ्याने त्‍यांना केली. युनूस म्हणाले, ‘‘ या विद्यार्थ्यांनी केलेल्या उग्र आंदोलनाची प्रचंड किंमत त्यांना मोजावी लागली आहे. विद्यार्थी एवढा मोठा त्याग करीत आहेत, देशवासीय त्याग करीत आहेत, तर माझीही काही जबाबदारी आहे, असा विचार करून मी विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली.’’ ऑलिंपिक समितीचे विशेष निमंत्रित म्हणून युनूस पॅरिसला गेले होते. ते लवकरात लवकर बांगलादेशला परतण्याची अपेक्षा आहे.

पहाटे व्हिडिओ संदेशाद्वारे आवाहन

याआधी, भेदभाव विरोधी विद्यार्थी चळवळीच्या समन्वयकांनी नोबेल पारितोषिक विजेते डॉ महम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारची रूपरेषा जाहीर केली होती. विद्यार्थी चळवळीचे प्रमुख समन्वयक नाहिद इस्लाम, आसिफ महमूद आणि अबू बकर मुझुमदार यांनी आज पहाटे सव्वाचार वाजता व्हिडिओ संदेशाद्वारे याबाबत माहिती दिली होती. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि देशातून पळून गेल्यानंतर युनूस यांनी हंगामी सरकारचे नेतृत्व करावे, असे मत बांगलादेशमधील विद्यार्थी आंदोलनाच्या प्रमुख संयोजकांनी व्यक्त केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Latest Marathi News Updates : शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

Share Market At Record High: शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला

SCROLL FOR NEXT