Munich Olympics Massacre esakal
ग्लोबल

Munich Olympics Massacre : खेळाडूंच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इस्राइलने एकेक पॅलेस्टिनी दहशतवादी शोधून त्यांना ठार केलं होतं

हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केला

सकाळ डिजिटल टीम

Munich Olympics Massacre : हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केला असून जर्मनीतील म्युनिक शहरात दहशतवादी हल्ल्याची ही पुनरावृत्ती असल्याचं दिसतं. या घटनेचा संबंध इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांशी होता. ही घटना घडली होती 51 वर्षांपूर्वी म्हणजेच 1972 साली.

पण त्यानंतर इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने जे काही केलं, ते अख्या जगाने पाहिलं आणि अनुभवलं. या घटनेनंतर इस्त्रायली एजन्सी मोसादची जगभरात ओळख झाली. ही एजन्सी आपल्या शत्रूंना हेरते आणि निवडून मारते अशी ही ओळख बनली.हमासच्या ताज्या हल्ल्यानंतर लोक मोसादकडून अशाच कारवाईची अपेक्षा करत आहेत. इस्रायल हमासला कसे सामोरे जाईल हे येणारा काळच ठरवेल. पण 1972 साली नेमकं काय घडलं होतं हे पाहण्याची गरज आहे.पॅलेस्टिनी दहशतवादी इस्रायली खेळाडूंच्या पोशाखात आले.

त्यावेळी जर्मनीच्या म्युनिक शहरात ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं होतं. बर्लिन 1936 नंतर प्रथमच एखाद्या जर्मन शहरात ऑलिम्पिक होत होतं आणि यानिमित्ताने नव्या, उदारमतवादी जर्मनीचे वैभव जगापुढे मांडण्यास तो देश उत्सुक होता. म्युनिच ऑलिम्पिकला 26 ऑगस्ट 1972 रोजी सुरुवात झाली. या विसाव्या ऑलिम्पिकमध्ये 120 देश सहभागी झाले होते. आनंदी ऑलिम्पिक असे या स्पर्धेचे वर्णन आयोजकांच्या वतीने करण्यात येत होते.

5 सप्टेंबरच्या पहाटे चार वाजता ब्लॅक सप्टेंबर संघटनेचे आठ पॅलेस्टिनी दहशतवादी ऑलिम्पिक ग्रामची भिंत चढून आत उतरले. ओळख लपवण्यासाठी त्यांनी अॅथलीटचे पोशाख परिधान केले होते. मूळ योजनेनुसार ते इस्रायली पथकाच्या इमारतींजवळ आले. तेथे त्यांच्याशी झालेल्या झटापटीदरम्यान एक इस्रायली कुस्ती प्रशिक्षक आणि एक वेटलिफ्टर मारले गेले. एक इस्रायली खेळाडू पळून जाण्यात यशस्वी झाला. इस्रायली पथकातील आणखी नऊ जणांना ओलीस ठेवण्यात आले.

इस्रायली तुरुंगांमध्ये बंदीवान असलेल्या 200 पॅलेस्टिनींची त्वरित मुक्तता ही प्रमुख मागणी या दहशतवादी संघटनेने केली होती. याशिवाय आणखी दोन दहशतवाद्यांची जर्मन तुरुंगांतून मुक्तता, तसेच पश्चिम आशियातील एखाद्या देशात विमानाने सुरक्षित प्रवासाची हमी आणि व्यवस्था या इतर मागण्या होत्या.

जर्मन सरकारने इस्रायलशी चर्चा केली पण त्यांच्या पंतप्रधान गोल्डा मीर यांनी तसे करण्यास नकार दिला. दबाव निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांनी आधीच ठार झालेल्या दोन खेळाडूंचे मृतदेह खाली फेकले. जर्मनीला हे प्रकरण मिटवण्याची इच्छा होती परंतु इस्रायलने नकार दिल्यानंतर त्यांनी दहशतवाद्यांची एक अट मान्य केली ज्यामध्ये त्यांना ओलिस खेळाडूंसह सुरक्षितपणे सोडायचे होते.

त्यांना बस देण्यात आली होती, ज्यामध्ये दहशतवादी खेळाडूंसह विमानतळाकडे रवाना झाले होते, परंतु जर्मन पोलिसांनाही ओलीस सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जेव्हा दहशतवाद्यांनी सशस्त्र पोलिसांची वाहने पाहिली तेव्हा ते घाबरले आणि क्षणाचाही विलंब न करता सर्व खेळाडूंना ठार मारले. जर्मन पोलिसांनी सर्व दहशतवाद्यांना जागीच ठार केले. तीन संशयितांनाही पकडण्यात आले.

ऑपरेशन ब्लॅक सप्टेंबर नंतर दुसरी मोहीम सुरू झाली

दहशतवाद्यांनी या ऑपरेशनला ब्लॅक सप्टेंबर असे नाव दिले होते. या घटनेनंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली होती. दुसरीकडे, इस्रायलने या प्रकरणी प्रत्युत्तराची कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मोसादला जबाबदारी देण्यात आली होती. हे एक गुप्तचर अभियान होते. याचा अर्थ अतिरेक्यांना मारून बदला घ्यायचा होता आणि इस्रायलचे नावही घ्यायचे नव्हते.

ऑपरेशनचे नाव होते - राथ ऑफ गॉड. हे ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी मोसादला जवळपास 20 वर्षे लागली पण त्यांनी कोणालाही सोडले नाही. कुणाला गोळ्या घालण्यात आल्या आणि कुणाच्या घरात बॉम्ब बसवून उडवले. एका दहशतवाद्याच्या घराच्या वाटेवर एक कार उभी होती आणि त्यात ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. बदला घेण्याची ही कृती वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या वेळी घडली.

जेव्हा जर्मनीच्या निर्णयावर इस्रायलला राग आला

दुसरीकडे, ऑक्टोबरमध्ये सीरियातून जर्मनीला येणाऱ्या विमानाचे अपहरण करण्यात आले आणि जर्मनीत अटक करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांच्या सुटकेची अट ठेवण्यात आली होती. जर्मनीने मान्य केले आणि तिघांनाही सोडण्यात आले. यावरून इस्रायलमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पंतप्रधानांनी ऑपरेशनला मंजुरी दिली. कोणत्याही टार्गेटला मारण्यापूर्वी मोसाद कधी त्याच्या घरी पुष्पगुच्छ पाठवत असे तर कधी वर्तमानपत्रात शोकसंदेश प्रसिद्ध करत असे.

सततच्या हल्ल्यांमुळे दहशतवादी संतापले होते. त्यांनी रोममध्ये इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मीर यांना मारण्याची योजना आखली होती. ही घटना जानेवारी 1973 ची आहे. पण मोसादला बातमी मिळाली आणि त्यांनी पंतप्रधानांना सुखरूप उतरवले आणि विमानतळाजवळील क्षेपणास्त्रही परत मिळवले. ज्या व्हॅनमध्ये क्षेपणास्त्र ठेवण्यात आले होते, त्या व्हॅनच्या चालकाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी खाली उतरण्याचा इशारा दिला असता त्याने गोळीबार सुरू केला.

एजन्सीने रोममध्ये राहणार्‍या भाषांतरकार अब्दुल वेलची गोळ्या घालून हत्या केल्यावर महिनाभरात मोसादला पहिले यश मिळाले. 16 ऑक्टोबर 1972 रोजी तो नुकताच जेवण करून परतला असताना त्याच्या घराजवळ आधीच उपस्थित असलेल्या एजंटने त्याला आपला बळी बनवले. 8 डिसेंबरला मोसादने पॅरिसमध्ये डॉ. महमूद हमशारी यांना आपला दुसरा बळी बनवला. त्यासाठी एजंटने त्याच्याशी पत्रकार म्हणून मैत्री केली. त्यानंतर त्यांच्या घरातील टेलिफोनजवळ बॉम्ब बसवण्यात आला.

फोन उचलताच स्फोट

ठरलेल्या कार्यक्रमानुसार एजंटने त्याला बोलावले. त्यांनी फोनला उत्तर देताच बॉम्बचा स्फोट झाला आणि ते त्याच्या फ्लॅटमध्ये गंभीर जखमी झाले. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. अशाप्रकारे काही महिन्यांतच आणखी चार दहशतवादी मारले गेले. उर्वरित दहशतवादी लेबनॉनमध्ये कडक सुरक्षेत राहत असल्याची माहिती मोसादला मिळाली. मोसादने वेगवेगळ्या मार्गाने आपले एजंट बेरूतला पाठवले. 9 एप्रिल 1973 रोजी पॅलेस्टाईनच्या मुक्तीसाठी पॉप्युलर फ्रंटच्या मुख्यालयावर हल्ला झाला. हे एक धोकादायक ऑपरेशन होते. येथे तीन दहशतवादी मारले गेले. मोहम्मद युसूफ, कमाल अडवान, कमाल नसीर अशी त्यांची नावे होती.

आणि मोसादने एक चूक केली

या काळात मोसादने चूक केली आणि नॉर्वेमध्ये त्यांनी म्युनिक हल्ल्याशी किंवा पॅलेस्टाईनमधील अतिरेकी संघटनेशी काहीही संबंध नसलेल्या माणसाला ठार मारले. नॉर्वेच्या पोलिसांनी सहा दलालांना पकडले. ही घटना 21 जुलै 1973 रोजी घडली होती. अटकेनंतर मोसादची संपूर्ण योजना उघड झाली आणि जगभरात इस्रायलवर टीका होऊ लागली. आंतरराष्ट्रीय दबावानंतर काही दिवस ऑपरेशन थांबवण्यात आले.

काही वर्षांनी मोसादने पुन्हा आपले मिशन सुरू केले. रेड प्रिन्स उर्फ अली हसन सलामे या दहशतवाद्याची अचूक माहिती मिळाल्यानंतर मोसाद एजंट ब्रिटिश पासपोर्टवर बेरूतला पोहोचला. तो राहत होता त्याच गल्लीत भाड्याने खोली घेतली. काही दिवसांनी मोसादचे आणखी काही एजंट तिथे पोहोचले.

22 जानेवारी 1979 चं साल होतं. ठरलेल्या कार्यक्रमानुसार, रेड प्रिन्स कारमध्ये त्याच्या सुरक्षा रक्षकांसह रस्त्यावर पोहोचताच, वाटेत आधीच उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट झाला आणि दहशतवादी आणि त्याचे सुरक्षा कर्मचारी ठार झाले. तो ब्लॅक सप्टेंबरचा मास्टरमाइंड होता. ही कारवाई अनेक वर्षे सुरू राहिली आणि मोसादने जगभरात फिरून दहशतवाद्यांना ठार केले. नंतर यावर आधारित चित्रपटही तयार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT