नवी दिल्ली : समोर सशस्त्र असं सैन्य उभं आहे. मागे देशाच्या लोकशाहीवर केल्या गेलेल्या हल्ल्याचा विरोध करणारे आंदोलनकर्ते! आणि दोहोंच्या मध्ये उभी आहे ती सिस्टर ऍन रोझ नु ताँग आणि त्यांना माहित होतं की त्यांना आता काय करायचं आहे. या नन गुडघ्यावर खाली बसल्या आणि सैन्याला आव्हान दिलं की आधी मला गोळी मारा. म्यानमारमध्ये सत्तापालट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आंदोलने होत असून त्यात अनेक हिंसक घटना घडत आहेत. या आंदोलनांमध्ये अनेक आंदोलक मारले गेले आहेत. सोमवारी देखील दोन आंदोलक मारले गेले आहेत. अशा परिस्थितीत सिस्टर रोजा यांचा एकच उद्देश होता तो म्हणजे आपल्या जिवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचवणे. जागतिक महिला दिनाला सैन्यासमोर धीरोधात्तपणे उभी राहणारी प्रतिमा एक प्रतिक बनली आहे.
म्यानमार उत्तर भागातील शहरामध्ये सशस्त्र पोलिस अधिकाऱ्यांपुढे गुडघे टेकून सिस्टर अॅन रोझ नु ताँग यांनी 'माझा जीव घ्या पण मुलांना सोडून द्या' अशी विनंती केल्याचं छायाचित्र सध्या जगभर पसरत आहे. साध्या पांढऱ्या पोशाखातील एक कॅथोलिक नन जी निशस्त्र आहे. तिने स्वत:चे हात पसरले आहेत आणि ती गुडघ्यावर बसली आहे. मागे आंदोलक आंदोलन करताहेत आणि त्यांना रोखण्यासाठी उभं असलेल्या शस्त्रधारी सैन्याला याचना करणारी तिची प्रतिमा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. बहुसंख्य-बौद्ध देशातील लोकांनी तिच्या या साहसाची प्रशंसा केली आहे.
यासंदर्भात बोलताना तिने म्हटलंय की, त्यांच्यासमोर मी गुडघे टेकले आणि म्हटलं की मुलांवर गोळीबार करु नका, मी तुम्हाला विनंती करते की त्यांच्याऐवजी मला गोळी घालून मारा, असं तिनं काल मंगळवारी एएफपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. म्यानमारमध्ये लष्कराने देशाची सत्ता ताब्यात घेतली असून तिथली लोकशाही धोक्यात आहे. ही लोकशाही परत प्रस्तापित व्हावी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलने सुरु असून त्यात अनेक हिंसक घटना घडून अनेकांचा जीवही गेला आहे. मात्र, सत्ताधारी लष्कराकडून अश्रुधूर, पाण्याच्या तीव्र फवाऱ्याचा मारा, रबर बुलेट्स आणि बंदुकीच्या वापर करून सैन्य आपल्या शक्तीचा वापर करुन हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे.
गेल्या सोमवारी जेंव्हा हेलमेट आणि घरातच बनवलेले शिल्ड्स घालून आंदोलक काचीन राज्याची राजधानी मायटकीइनाच्या रस्त्यावर उतरले तेंव्हा पोलिसांनी त्यांना घेरलं. यावेळी सिस्टर अॅन रोज नु ताँग आणि इतर दोन नन यांनी लष्करी अधिकाऱ्यांना या सर्वांना सोडून देण्याची विनंती केली. आपल्या मुलाखतीत पुढे त्या म्हणाल्या की, पोलिस त्या आंदोलक मुलांना पकडण्यासाठी पाठलाग करीत होते आणि मला मुलांची काळजी वाटत होती. काही क्षणानंतर ती पोलिसांना हे सगळं थांबवण्यासाठी याचना करत असतानाच पोलिसांनी त्यांच्या मागे असलेल्या निदर्शकांच्या गर्दीत गोळीबार सुरू केला त्यामुळे मुले घाबरुन पुढे धावायला लागली. या परिस्थितीत मी काहीही करू शकत नव्हते परंतु मी या मुलांना वाचवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.