भाजपच्या नेत्यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादाला तोंड फुटलंय. अरबच्या दुतावासाने भारताला यासंदर्भात माहितील दिल्यानंतर भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांची हकालपट्टी झाली आहे. नवीनकुमार जिंदाल यांच्यावरही कारवाई करण्यात आली. मात्र या दरम्यान आणखी एका वादाला तोंड फुटलंय. (Paigambar Controversy)
अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यामुळे नव्या वादाला तोंड फुटू शकतं. काँग्रेसने यासंदर्भात ट्वीट करत अरब देशांच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे.(Narendra Modi Photo on Garbage Bags)
कॉँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. यामध्ये मोदींचे पोस्टर करचाकुंडीवर चिटकवल्याचं त्यांनी म्हटलंय. या ट्वीटमध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनाही टॅग केलं आहे.
आम्ही मोदी आणि भाजपला या देशातलोकशाही मार्गाने पराभूत करूच पण आमचा मोदीविरोध या देशात आहे. मात्र, कचराकुंडीवर आमच्या पंतप्रधानाचा फोटो लावणं, हे आम्हाला स्वीकार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. प्रत्येक भारतीयाने याचा विरोध केला पाहिजे, असं राजपूत यांनी आवाहन केलं आहे.
दोन भाजप नेत्यांची हकालपट्टी
इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur sharma) आणि नेते नवीन कुमार जिंदाल (Naveen jindal) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे अनेक आखाती देशांमध्ये भारताविरोधात संतापाची लाट उसळली असून या देशांमधील असलेली नाराजी सध्या भारतासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. या आखाती देशांमध्ये बहारीन, कतार, कुवेत, इराण आणि ओमानसह अन्य अनेक देशांचा समावेश आहे. (Nupur sharma and naveen jindal suspended from bjp due to controversial statement about mohmmad paigambar)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.