NASA researchers claim electric Car motor will charge in five minutes  sakal
ग्लोबल

इलेक्ट्रिक मोटार होईल पाच मिनिटांत चार्ज

‘नासा’तील संशोधकांचा दावा; अवकाश मोहिमांसाठीच्या तंत्रज्ञानाचा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : जगभरात सर्वत्र इलेक्ट्रीक मोटारींच्या वापराला प्रोत्साहन दिले जात असतानाच आता या मोटारी केवळ पाच मिनिटांतच चार्ज होतील, असे तंत्रज्ञान अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने तयार केले आहे. अर्थात, हे तंत्रज्ञान त्यांनी भविष्यातील अवकाश मोहिमांसाठी तयार केले असले तरी त्याचा वापर मोटारी चार्ज करण्यासाठीही केला जाऊ शकतो. यामुळे या वाहनांचा वापर करणाऱ्यांची संख्याही वाढेल, असा विश्‍वास ‘नासा’ने व्यक्त केला आहे.

अमेरिकेतील पर्ड्यु विद्यापीठातील संशोधकांनी ‘फ्लो बॉइलिंग अँड कंडेन्सेशन’ (एफबीसीई) हा प्रयोग विकसित केला आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अत्यंत कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या वातावरणात दोन टप्प्यांत द्रव पदार्थाचे वहन आणि उष्णतेचे रूपांतर करण्यासाठीचा हा प्रयोग आहे. ‘सबकूल्ड फ्लो बॉइलिंग’ या नव्या तंत्रज्ञानामुळे उष्णतेचे रूपांतर अधिक परिणामकारक पद्धतीने शक्य असून भविष्यात अवकाशात तापमान नियंत्रणासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. याच तंत्रज्ञानाचा पृथ्वीवरही वापर होऊ शकतो. इलेक्ट्रिक मोटारीमध्ये त्याचा प्रभावीपणे वापर शक्य आहे, असा संशोधकांचा दावा आहे.

तंत्रज्ञानाचा वापर

नवीन तंत्रज्ञानाचा वापर मोटारींच्या चार्जिंगसाठी होऊ शकतो, हे संशोधकांना ‘एफबीसीई’ प्रयोगातून लक्षात आले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे, डायइलेक्ट्रिक लिक्विड कूलंट हे चार्जिंग केबलमधून सोडले जाते. येथे विद्युत वहन करणाऱ्या कंडक्टरद्वारे निर्माण झालेली उष्णता हे कूलंट शोषून घेते. त्यामुळे सुमारे २४.२२ किलोवॉट ऊर्जा काढून टाकल्याने सध्याच्या चार्जरपेक्षा ४.६ पट अधिक वेगाने वीजेचे वहन होते. यामुळे चार्जिंग केबल २४०० ॲम्पियरचा वीज पुरवठा करू शकते.

चार्जिंगसाठी लागणारा वेळ

इलेक्ट्रिक मोटारी चार्ज होण्यासाठी सध्या वीस मिनिटे ते एक तास इतका वेळ लागतो. काही मोटारींसाठी हा वेळ याहून अधिक आहे. चार्जिंगसाठी लागणारा वेळ आणि चार्जिंग स्टेशनची कमी संख्या या इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक प्रसार होण्यातील मोठा अडथळा असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. चार्जिंगसाठीचा वेळ पाच मिनिटांवर आणण्यासाठी चार्जिंग यंत्रणेला १४०० ॲम्पियरचा विद्युतप्रवाह मिळणे आवश्‍यक आहे. सध्याच्या अत्याधुनिक चार्जरला केवळ ५२० ॲम्पियरचा वीजेचा पुरवठा होतो. इतर अनेक चार्जरला तर १५० हून कमी ॲम्पियर वीजेचा पुरवठा होतो. चार्जरला १४०० ॲम्पियरचा वीजपुरवठा झाल्यास अधिक तापमान उष्णता निर्माण होऊन वेगाने चार्जिंग होऊ शकते. मात्र, त्यासाठी तापमानावर नियंत्रण ठेवणारी अत्याधुनिक यंत्रणाही हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT